शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द! - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 16:38 IST

खुल्या भूखंडाचा कायाकल्प केला जाईल, अशी ग्वाही देत अकोल्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन गृहराज्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.

ठळक मुद्देविकास निधीतून ९७ लाख रुपये मंजूर केले आहेत. या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते रविवारी सकाळी झाले.खेळाचे मैदानही विकसित केले जाणार आहे, त्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

अकोला: शहरात अनेक विकास कामे सुरु आहेत, या सर्व कामांसह शहराच्या सर्वांगिण विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जेष्ठ नागरिक, महिला, मुले यांच्याकरीता शहरातील खुल्या भूखंडांचे सुशोभिकरणाची कामे सुरु आहेत. या माध्यमातून खुल्या भूखंडाचा कायाकल्प केला जाईल, अशी ग्वाही देत अकोल्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन गृहराज्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.तापडिया नगर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणाचे सौंदर्यीकरण करण्याकरीता पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी त्यांच्या विकास निधीतून ९७ लाख रुपये मंजूर केले आहेत. या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते रविवारी सकाळी झाले. त्यावेळी सदर क्रिडांगणावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार गोपीकिशन बाजोरिया, नगरसेवक हरिष अलीमचंदाणी, गिरीश गोखले, अशिष पवित्रकार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण, माजी आमदार वसंतराव खोटरे, डॉ. अशोक ओळंबे, माजी जि.प. अध्यक्ष दादासाहेब मते, माजी नगरसेवक गोपीभाऊ ठाकरे, डॉ. आर.एन. भांबुरकर, डॉ. अनिरुध्द भांबुरकर, डॉ. प्रशांत वायाचाळ, दीपक मायी, आरती लढ्ढा, डॉ. पुरुषोत्तम तायडे, अकोला अर्बन बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब पाठक, पालकमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी उज्वल चोरे, स्वीय सहायक प्रवीण साखरे, शरद झामरे आदी मान्यवर उपस्थित होते.शहरात अनेक विकास कामे सुरु आहेत, असे सांगून पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले की, एक सामाजिक जबाबदारी म्हणून शहरातील खुले भूखंड सुशोभित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणाशी माझे लहानपणापासून नाते आहे, या क्रिडांगणाचे सुशोभिकरण करीत असताना जेष्ठांपासून ते मुलांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त असे हे क्रिडांगण केले जाईल.२ शहरात सध्या सांस्कृतिक घडामोडींसाठी भव्य सांस्कृतिक भवन बांधण्याचे काम सुरु आहे, याच परिसरात एक खेळाचे कॉम्पलेक्स, महाजलतरण तलाव, खेळाचे मैदानही विकसित केले जाणार आहे, त्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही यावेळी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले.यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, नगरसेवक गिरीष गोखले, डॉ. अशोक ओळंबे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय मिश्रा यांनी केले, तर आभार अ‍ॅड अनुप देशमख यांनी मानले.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील