शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलासाठी शासकीय जागेची मोजावी लागणार किंमत! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:54 IST

अकोला : ग्रामीण भागातील घरकुल मंजूर असलेल्या लाभार्थींकडे स्वमालकीची जागा नसल्यास शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल करून त्यापोटी शुल्क वसूल करण्याची तयारी शासनाने केली आहे. काही लाभार्थींना पं. दीनदयाळ उपाध्याय घरकुल लाभार्थी अर्थसहाय्य योजनेतून ५० हजारांपर्यंत मदत देण्याचा पर्याय असला, तरी जागा नियमानुकूल करण्याचे शुल्क न भरल्यास अतिक्रमण काढून टाकण्याचेही बजावल्याने शासनाकडून किती लाभार्थींना मदत दिली जाईल, ही बाब येणारा काळच ठरवणार आहे.

ठळक मुद्देमालकीच्या जागेसाठी हजारो घरकुलांची मंजुरी रखडली

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ग्रामीण भागातील घरकुल मंजूर असलेल्या लाभार्थींकडे स्वमालकीची जागा नसल्यास शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल करून त्यापोटी शुल्क वसूल करण्याची तयारी शासनाने केली आहे. काही लाभार्थींना पं. दीनदयाळ उपाध्याय घरकुल लाभार्थी अर्थसहाय्य योजनेतून ५० हजारांपर्यंत मदत देण्याचा पर्याय असला, तरी जागा नियमानुकूल करण्याचे शुल्क न भरल्यास अतिक्रमण काढून टाकण्याचेही बजावल्याने शासनाकडून किती लाभार्थींना मदत दिली जाईल, ही बाब येणारा काळच ठरवणार आहे.‘सर्वांनाच घरे’ या संकल्पनेनुसार ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थींसाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली आहे. योजनेसाठी २०११ मध्ये झालेल्या आर्थिक, सामाजिक, जातीनिहाय सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात एकूण ६७ हजार लाभार्थी पात्र आहेत. घरकुलांसाठी निवड झालेल्या लाभार्थींची गावात स्वमालकीची जागा असल्यासच लाभ देण्याची अट शासनाने टाकली. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत ५० टक्क्यांपेक्षाही अधिक लाभार्थींना योजनेपासून वंचित ठेवण्यात शासन यशस्वी झाले. चालू वर्षात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला प्राप्त पत्रानुसार ८,४२६ घरकुलांचा लक्ष्यांक आहे. घरकुल मंजूर झालेल्या हजारो लाभार्थींकडे स्वत:ची जागा नसल्याने त्यांचे प्रस्तावच तयार झाले नाही. त्यामुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनेतील घरकुलांचे जीओ टॅगिंग करण्याची प्रक्रिया संथ गतीने आहे. घरकुलासाठी स्वमालकीची जागा आवश्यक असल्याने त्या अटींची पूर्तता करणे हजारो लाभार्थींना अशक्य आहे. रमाई आवास योजनेतून जिल्ह्यात २००० घरकुल मंजूर आहेत. त्यापैकी एकही घरकुल अद्यापपर्यंत मंजूरच झाले नाही. रमाई आवास योजनेतून घरकुलाचा लाभ घेण्यासाठी गावात स्वमालकीची जागा असल्याशिवाय तो मिळतच नाही. राज्यातील सर्वच ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांनी त्याबाबतची तक्रार शासनाकडे केली. त्यावर उपाय म्हणून ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थींचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा शासन निर्णय १६ फेब्रुवारी रोजी काढण्यात आला. त्याची अंमलबजावणीही अद्याप सुरू झाली नाही. तसेच नियमानुकूल करण्याची प्रक्रिया किचकट असल्याने चालू वर्षात लाभार्थींच्या नावे जागा होणे अशक्यच आहे. त्यामुळे ३१ मार्च अखेर हजारो लाभार्थींचे घरकुलाचे स्वप्न अपूर्णच राहणार आहे.

शासन करणार जागेची रक्कम वसूलपंचायत समिती स्तरावर जागेचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याला समितीने मंजुरी दिल्यानंतर संबंधित अतिक्रमकांकडून शुल्क वसुली केली जाईल. त्यापैकी दहा टक्के रक्कम ग्रामपंचायतीच्या ‘विशेष ग्रामीण गृहनिर्माण फंड’ यात जमा केली जाणार आहे. 

समितीचे अध्यक्ष उप विभागीय अधिकारी पंचायत समिती स्तरावर गावातील अतिक्रमण नियमानुकूल करण्यास मंजुरी देण्यासाठी उप विभागीय अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती निर्णय घेणार आहे. त्यामध्ये सदस्य म्हणून तहसीलदार तर सचिव म्हणून गटविकास अधिकाºयांना काम पाहावे लागणार आहे. 

अतिक्रमणाच्या जागेनुसार करणार नियमानुकूलग्रामीण भागातील नागरिकांनी ज्या ठिकाणी अतिक्रमण केले, तेथेच नियमानुकूल करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे द्यावा लागणार आहे. त्यामध्ये गायरान जमिनी, सार्वजनिक वापरातील जमिनी, वन क्षेत्र, ज्या जमिनीवर वास्तव्य करणे शक्य नाही, अशा जमिनी वगळल्या जातील. तसेच आहे त्याच जागेचे अतिक्रमण नियमानुकूल करणे शक्य नसल्यास पर्यायी ठिकाणीही लाभार्थींना जागेचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठीच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी मंजुरी देतील.  

टॅग्स :Akolaअकोला