अकोला: दीपावलीच्या कालावधीत सलग चार दिवसांची सुटी आल्याने, सरकारी कर्मचार्यांना यंदाची दिवाळी चांगलीच पावली आहे. सलग सुट्यांचा आनंद घेत सरकारी अधिकारी व कर्मचार्यांकडून दिवाळीचा सण साजरा केला जात आहे.विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर दिवाळी सणाच्या कालावधीत सरकारी- निमसरकारी कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचार्यांना २३ ऑक्टोबर रोजी लक्ष्मी पूजन, २४ ऑक्टोबर रोजी दीपावली पाडवानिमित्त आणि २५ ऑक्टोबर रोजी चवथा शनिवार आणि २६ ऑक्टोबर रोजी रविवार अशी सलग चार दिवसांची सुटी आली आहे. लागोपाठ आलेल्या सुट्यांच्या कालावधीत चार दिवस सरकारी -निमसरकारी कार्यालये बंद राहणार असून, सुट्यांचा आनंद घेत, अधिकारी-कर्मचार्यांच्या दिवाळी साजरी करण्याच्या आनंदात भर पडली आहे. या सुट्यांच्या कालावधीत दीपावलीनिमित्त अनेक अधिकारी व कर्मचार्यांनी बाहेरगावी नातेवाईकांकडे जाण्याचे नियोजनही केले आहे. *कार्यालयांचे कामकाज सोमवारपासून पूर्ववत!दिवाळीच्या कालावधीत सरकारी कार्यालयांना सलग चार दिवसांच्या सुट्या आल्या आहेत. त्यामुळे २३ ऑक्टोबरपासून, कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे. चार दिवसांची सुटी संपल्यानंतर सोमवार,२७ ऑक्टोबरपासून सरकारी-निमसरकरी कार्यालयांमधील कामकाज पूर्ववत होणार आहे. त्यामुळे सोमवारनंतर शासकीय कार्यालयात नागरिकांची कामांसाठी गर्दी होणार आहे.
शासकीय कर्मचा-यांची ‘दिवाळी’
By admin | Updated: October 25, 2014 01:14 IST