शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कर्मचारी करतोय चौकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 17:54 IST

नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून रामदासपेठेतील एक युवक पुढे सरसावला आहे.

अकोला: कोरोना विषाणूचा प्रकोप वाढत आहे. अकोल्यात आतापर्यंत दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. असे असतानाही नागरिक फारसे गंभीर दिसत नाहीत. नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून रामदासपेठेतील एक युवक पुढे सरसावला आहे. विशेष वेशभुषा करून हा युवक शहरातील गर्दीच्या ठिकाणी फिरून मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्याचे आवाहन करताना दिसत आहे.रामदासपेठेत राहणारे प्रकाश बागडे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील ट्रेसरीमध्ये कर्मचारी आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे दिसून येत असल्यानंतरही नागरिक त्याविषयी गंभीर दिसत नाहीत. भाजीपाला खरेदी करताना, नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोरोनासारख्या भयंकर आजाराला आमंत्रण देण्यासारखे आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रकाश बागडे स्वत:चा जीव धोक्यात घालून जनजागृती करीत आहेत. बुधवारी त्यांनी जठारपेठेतील दिवेकर चौक, सातव चौकामध्ये भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करा आणि गरज असेल तर घराबाहेर पडा. घराबाहेर निघणे टाळा, असे आवाहन प्रकाश बागडे करीत आहेत. जीवतोडून लोकांना ते समजावण्याचा प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस