शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या धान्यावर शासनाने लावला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:22 IST

मूर्तिजापूर : गोरगरीब जनतेला सरकारी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून शिधापत्रिकेवरील धान्याचा केला जाणारा पुरवठा केंद्र व राज्य शासनाने बंद केल्याने मजूर व सर्वसामान्य नागरिकांना जगणे बिकट झाले आहे.

ठळक मुद्देगहू, तांदूळ, साखरेचे वाटप बंद

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : गोरगरीब जनतेला सरकारी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून शिधापत्रिकेवरील धान्याचा केला जाणारा पुरवठा केंद्र व राज्य शासनाने बंद केल्याने मजूर व सर्वसामान्य नागरिकांना जगणे बिकट झाले आहे. कारण सध्या कामधंदे नसल्याने मजुरी मिळविणे दुरापास्त झाले आहे. आता स्वस्त धान्य मिळणे बंद झाल्याने गरिबांची कोंडी झाली आहे. त्यांना आता महागडे धान्य विकत घेऊन उपजीविका भागविण्याची वेळ आली आहे.गरिबांना स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून शिधापत्रिकेवर धान्य उपलब्ध करून देण्याचे शासनाचे ध्येयधोरण आहे; मात्र शासनाने गरिबांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून त्यांचे अन्न हिरावून घेतल्याने जनतेत शासनाप्रती नाराजीचा सूर उमटत आहे. केंद्र व राज्य शासनाने पूर्वी सन २०१४ पासून केसरी शिधापत्रिकाधारकांचे धान्य व केरोसीन बंद केले. त्यानंतर जुलै २०१७ पासून ‘बीपीएल’वरील साखरेचे वाटप बंद करण्यात आले. एवढेच नव्हे, तर मागील चार महिन्यांपासून ‘बीपीएल’वरील तांदूळ वाटप बंद झाले. केंद्र व राज्य शासनाने केरोसीनचा कोटा वाढवून देण्याऐवजी कमी केला आहे. त्यामुळे एका सिलिंडरधारकास मिळणारे रॉकेलही पूर्णपणे बंद झाले आहे. एखादेवेळी कोणाच्या घरात कुणाचे निधन झाल्यास त्या व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी रॉकेल मिळणे सध्याच्या घडीला रॉकेल आवश्यक ठरते; पण रॉकेलचा तुटवडा असल्याने त्याने अंत्यविधी कसा पूर्ण करावा, असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.