शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

युवा संसदच्या माध्यमातून शासकीय योजनांचा प्रचार करण्याचा शासनाचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 14:30 IST

अकोला: माध्यमिक शिक्षण विभाग व क्रीडा विभागाच्यावतीने युवक कल्याण कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये युवा संसद व वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून राज्य शासनाकडून शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहेत

अकोला: माध्यमिक शिक्षण विभाग व क्रीडा विभागाच्यावतीने युवक कल्याण कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये युवा संसद व वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून राज्य शासनाकडून शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहेत. त्या दृष्टिकोनातून वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, निर्मल ग्राम, श्रमदान, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसह इतर शासकीय योजनांवर विद्यार्थ्यांनी विचार मांडावे, असे शिक्षण विभागाला निर्देश देण्यात आले आहेत.राष्ट्रीय व राज्य निर्माणामध्ये युवकांचा सहभाग वाढावा, त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, सामाजिक कार्यासाठी युवकांना प्रोत्साहन द्यावे आणि युवकांचे विचार व अपेक्षा जाणून घ्याव्यात, या उद्देशाने उच्च माध्यमिक शिक्षण विभाग, क्रीडा विभागाच्यावतीने १0 आॅगस्ट ते ३१ आॅगस्टदरम्यान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालय, तालुका, गटस्तर, जिल्हा आणि राज्यस्तरावर युवा संसद कार्यक्रमासोबत वक्तृत्व स्पर्धा उपक्रम राबविण्यात येणार आहे. १0 ते १५ आॅगस्टदरम्यान कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा, १६ ते २0 आॅगस्टदरम्यान तालुका व गटस्तरावर वक्तृत्व स्पर्धा, २१ ते २६ आॅगस्टदरम्यान जिल्हास्तरावर आणि २८ ते ३१ आॅगस्टदरम्यान राज्यस्तरावर युवा संसद आयोजित करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. शासकीय योजनांचा प्रचार, प्रसार करून युवकांचे शासनाविषयी काय मत आहे, हे जाणून घेण्यासाठी राज्य शासन युवा संसद उपक्रमाचा वापर करीत असल्याचे बोलले जात आहे.

शासकीय योजनांवर वक्तृत्व स्पर्धायुवा संसदेमध्ये विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय योजनांवर विचार मांडणे सक्तीचे आहे. प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, निर्मल ग्राम अभियान, श्रमदान, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, आयुष्यमान भारत, सर्वांसाठी घरे, सेवा हमी कायदा, मुद्रा योजना, पीक विमा योजना, मुख्यमंत्री, पंतप्रधान ग्रामसडक योजना, जलयुक्त शिवार, कौशल्य विकास कार्यक्रम, सुप्रशासन आणि चांद्रयान मोहीम आदी विषयांवर विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेत विचार मांडावे लागणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना १00 गुण दिले जाणार आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना