शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कॅनरा बँकेलाही जिल्हाधिकाऱ्यांचा दणका ; शाखांमधील शासकीय खाते बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 14:25 IST

अकोला : शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात पातूर येथील कॅनरा बँक शाखेची नकारात्मक भूमिका आढळून आल्याने, कॅनरा बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांमधील शासकीय खाते बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी दिला.

ठळक मुद्देकाही बँकांकडून पीक कर्ज वाटपाचे काम संथगतीने सुरू आहे, तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात बँकांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. पीक कर्ज वाटपात नकारात्मक भूमिका घेणाऱ्या कॅनरा बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांमधील शासकीय खाते बंद करण्याचा दणका जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १५ जून रोजी दिला.

अकोला : शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात पातूर येथील कॅनरा बँक शाखेची नकारात्मक भूमिका आढळून आल्याने, कॅनरा बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांमधील शासकीय खाते बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी दिला. त्यामुळे पीक कर्ज वाटपात टाळाटाळ करणाऱ्या अ‍ॅक्सीस बँक पाठोपाठ कॅनरा बँकेलाही जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला आहे.खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येत असून, पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील बँकांना दिले आहेत; मात्र काही बँकांकडून पीक कर्ज वाटपाचे काम संथगतीने सुरू आहे, तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात बँकांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवार, १५ जून रोजी पातूरचे तहसीलदार डॉ.रामेश्वर पुरी यांच्यासोबत पातूर येथील कनरा बँकेच्या शाखेला भेट दिली असता, बँक शाखेतील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी शेतकºयांना पीक कर्ज वाटपाच्या कामात हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असून, शेतकºयांना पीक कर्ज वाटपाच्या योजनेपासून वंचित ठेवत असल्याचे आढळून आले, तसेच पीक कर्जासाठी पात्र असलेल्या खातेदार शेतकºयांना कागदपत्रांची पूर्तता करण्याचे सांगून, पीक कर्ज वाटपाची जबाबदारी टाळत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पीक कर्ज वाटपात नकारात्मक भूमिका असल्याचे दिसून येत असल्याने, कॅनरा बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांमधील शासकीय खाते बंद करून, या बँकेच्या शाखांचे शासकीय खाते जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचे उत्कृष्ट काम करणाºया बँकेत उघडण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिला. पीक कर्ज वाटपात टाळाटाळ करणाऱ्या अ‍ॅक्सीस बँकमधील ४५ कोटींच्या शासकीय ठेवी काढून घेण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी गत सोमवारी दिला होता. त्यापाठोपाठ पीक कर्ज वाटपात नकारात्मक भूमिका घेणाऱ्या कॅनरा बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांमधील शासकीय खाते बंद करण्याचा दणका जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १५ जून रोजी दिला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेयbankबँक