शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शासनच करतेय हरित लवादाच्या आदेशाची अवहेलना!

By admin | Updated: May 8, 2017 02:51 IST

अन्न व औषधी प्रशासनाने उघड्यावर जाळला दोन ट्रक गुटखा.

अकोला : देशभरातील रस्त्यावर, उघड्या ठिकाणी कचरा जाळण्यावर राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) निर्बंध लावले असून, डिसेंबर २0१६ मध्ये यासंबंधीचा आदेश दिला; परंतु शासनाकडूनच हरित लवादाच्या आदेशाची सर्रास पायमल्ली होताना दिसून येत आहे. हरित लवादाच्या आदेशानंतरही शासनानेसुद्धा उघड्यावर कचरा जाळण्यास बंदी घातली असताना, शासनाचा एक विभाग असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी चक्क उघड्यावर दोन ट्रक गुटखा उघड्यावर जाळून शहराच्या प्रदूषणात भरच घातली आहे. त्यामुळे शासन अन्न व औषध प्रशासनावर दंडात्मक कारवाई करेल का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. राष्ट्रीय हरित लवादाकडून घनकचरा व्यवस्थापन नियमांचे सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना सक्तीने पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यावरण मंत्रालय आणि राज्य सरकारांना लवादाने पीव्हीसी आणि क्लोरिनेटेड प्लास्टिकवर सहा महिन्यांमध्ये बंदी घालण्याचा आदेश दिला आहे; परंतु या आदेशाकडे शासन दुर्लक्ष करीत असून, कायद्याचा भंग करण्याचा सपाटाच शासनाच्या अधिकार्‍यांनी लावला आहे. शनिवारी अन्न व औषध प्रशासनाने जिल्हय़ातील कारवायांमधील जप्त केलेला १ कोटी ६८ लाखांचा दोन ट्रक गुटखा, सुगंधीत तंबाखू खडकी परिसरात उघड्यावर जाळून हरित लवादाच्या आदेशाची अवहेलना करून शहराच्या वाढत्या प्रदूषणात भर घातली आहे. गुटख्याची विक्री करण्यासाठी सर्रास प्लास्टिक पाकिटांचा वापर केला जातो, तसेच विविध प्रकारची रासायनिक प्रक्रिया करून गुटखा तयार केला जातो. शरीरासाठी अत्यंत घातक आणि पर्यावरणास हानिकारक असलेल्या प्लास्टिक पाकिटातील गुटखा जाळून अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण केला. अन्न व औषध प्रशासनाने जाळलेल्या गुटख्यामुळे खडकी परिसरात मोठय़ा प्रमाणात प्रदूषण निर्माण झाले.हे प्रदूषण नागरिकांसाठी हानिकारक आहे. गुटखा न जाळता, त्याची जमिनीमध्ये पुरूनसुद्धा विल्हेवाट लावता आली असती; परंतु अन्न व औषध प्रशासनाने उघड्यावर गुटखा जाळून कायद्याचा भंग केल्याचा आरोप पर्यावरण तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. मोठय़ा प्रमाणात झाले प्रदूषणइस शहर को ये हुआ क्या, कहीं राख है तो कहीं धुंवा-धुंवा..अशी चित्रपटाच्या सुरुवातीला लागणारी ही जाहिरातीतील वाक्ये आता अन्न व औषध प्रशासनाने गुटखा जाळून केलेल्या हवा प्रदूषणासाठी वापरावीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शनिवारी दुपारी अन्न व औषध प्रशासनाने दोन ट्रकमध्ये गुटख्याची व तंबाखूची पाकिटे भरून खडकी परिसरात आणले. येथील एका नाल्यामध्ये त्यांनी गुटखा जाळला. गुटखा जाळल्यामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात प्रदूषण झाले. परिसरात आजूबाजूला अनेक घरे होती. त्यामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात गुटख्याचा धूर आणि वातावरणात वेगळीच दुर्गंधी पसरली होती. शासनाच्या नियमांनुसार आम्हाला जप्त केलेला गुटखा, तंबाखू जाळूनच नष्ट करावा लागतो. दुसरा पर्यायच नाही, त्यामुळे आम्ही शहराबाहेर दोन ट्रक गुटखा नेऊन खडकी परिसरात जाळला. प्रदूषण होऊ नये, असा आमचा उद्देश आहे. गुटखा जाळल्यामुळे कोणतेही प्रदूषण झाले नाही.-नितीन नवलकार, निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन.गुटखा जाळल्यामुळे निश्‍चित वातावरणात प्रदूषण पसरते. गुटखा पॅकिंगसाठी मोठय़ा प्रमाणात प्लास्टिकचा वापर होता. रासायनिक प्रक्रियासुद्धा होते. गुटख्यापासून निर्माण होणारे प्रदूषण मानवी आरोग्यास हानिकारक आहे. गुटखा जाळण्याऐवजी तो जमिनीत पुरून नष्ट करायला हवा, तसेच गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ पाण्यात मिसळल्यास जलचरांवर त्याचा परिणाम होतो. -उदय वझे,पर्यावरण अभ्यासक.