अकोला: शहरातील विकास कामांसाठी शासनाकडे दलितेत्तर योजना, सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हा स्तर) व वैशिष्ट्यपूर्ण बाबी अंतर्गत विकास निधीचा प्रस्ताव महापौर उज्ज्वला देशमुख यांनी शासनाकडे सादर केला. यापैकी दलितेत्तर योजनेंतर्गत ५0 कोटींचे अनुदान देण्यावरून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. शहराच्या बकाल अवस्थेला सुधारण्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. निधी खेचून आणण्यासाठी सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी शासनाकडे शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे. शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, प्रभागातील नाली, मोठे नाले, रस्ता रुंदीकरण, फुटपाथ, चौकांचे सौंदर्यीकरण आदी विकास कामांसह जलप्रदाय, विद्युत व आरोग्य विभागातील कामे मार्गी लावणे गरजेचे आहे. शिवाय घनक चरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा सुरळीत करण्याची आवश्यकता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महापौर उज्ज्वला देशमुख यांनी महापालिके ला सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हा स्तर) अंतर्गत ५0 कोटी रुपये, तेराव्या वित्त आयोगांतर्गत ५0 कोटी व वैशिष्ट्येपूर्ण बाबी अं तर्गत २0 कोटी अनुदानाची मागणी केली. विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना महापौर उज्ज्वला देशमुख यांनी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची भेट घेतली. दलितेत्तर निधी अंतर्गत विकास कामे मार्गी लावणे शक्य असल्याचे मत व्यक्त करीत त्यासाठी ५0 कोटींचे अनुदान मंजूर करण्याची विनंती सामाजिक न्यायमंत्री बडोले यांना करण्यात आली. महापौरांच्या मागणीवर सामाजिक न्यायमंत्र्यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत.
५0 कोटींच्या निधीसाठी शासन सकारात्मक
By admin | Updated: March 28, 2015 01:54 IST