शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘स्थायी’च्या आढावा बैठकीत प्रशासनाचा फ्लॉप शो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 01:46 IST

अकोला : नगरसेवकांनी वारंवार सूचना करूनही प्रभागातील समस्या निकाली काढल्या जात नाहीत. क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षकांसह विविध विभाग प्रमुख व अतिक्रमण अधिकार्‍यांच्या बेताल कारभारामुळे डोक्याचा भुगा होण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देकामे होत नसतील तर स्पष्ट करा; सभापतींनी काढली खरडपट्टी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नगरसेवकांनी वारंवार सूचना करूनही प्रभागातील समस्या निकाली काढल्या जात नाहीत. क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षकांसह विविध विभाग प्रमुख व अतिक्रमण अधिकार्‍यांच्या बेताल कारभारामुळे डोक्याचा भुगा होण्याची वेळ आली आहे. नागरिकांचा रोष वाढत असल्याने तुमच्याकडून कामे होत नसतील, तर तसे स्पष्ट करा, असे सांगत स्थायी समिती सभापती बाळ टाले यांनी मनपा अधिकार्‍यांची खरडपट्टी काढली. गुरुवारी स्थायी समितीच्या आढावा बैठकीत नगरसेवकांनी विचारलेल्या बहुतांश प्रश्नांचे निराकरण करण्यात मनपाचे अधिकारी ‘फ्लॉप’ झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. महापालिकेची स्थायी समिती असो वा सर्वसाधारण सभा, यामध्ये प्रभागातील समस्यांचा पाढा वाचणार्‍या नगरसेवकांच्या पदरी निराशाच आल्याची परिस्थिती आहे. बोटावर मोजता येणारे दोन चार प्रभावी नगरसेवक व पदाधिकार्‍यांच्या प्रभागात मनपाची यंत्रणा सक्रिय असून, उर्वरित प्रभागांमध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती आहे. या पृष्ठभूमीवर स्थायी समिती सभापती बाळ टाले यांनी गुरुवारी उपायुक्त, लेखाधिकारी तसेच सर्व विभाग प्रमुख, उपअभियंत्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन केले. यापूर्वी स्थायी समितीने घेतलेल्या कोणकोणत्या निर्णयांवर अंमलबजावणी झाली, याचा आढावा घेण्यात आला असता संबंधित विभाग प्रमुखांसह उपायुक्त समाधानकारक खुलासा करू शकले नाहीत. नगरसेवकांच्या समस्या निकाली काढण्यात मनपाची यंत्रणा सपशेल अपयशी ठरत असल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले. बैठकीला बाळ टाले, सुमनताई गावंडे, नगरसेवक सुनील क्षीरसागर, अजय शर्मा, विजय इंगळे, अमोल गोगे, दिलीप मिश्रा, फैयाज खान, नौशाद अहमद, पराग कांबळे, मोहम्मद मुस्तफा, सिद्धार्थ उपर्वट, उपायुक्त समाधान सोळंके, सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, सहा. आयुक्त जीतकुमार शेजव तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका