शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

शिक्षकांच्या बदल्यांमध्ये शासनाचाच घोळ ; हजारो शिक्षकांना वेठीस धरल्याचा मुद्दा सभेत गाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 13:14 IST

अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या करून शासनाने त्यामध्ये प्रचंड घोळ घातला आहे. त्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या अधिकाराचीही गळचेपी केली आहे. शासन स्तरावरूनच भ्रष्टाचार करण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी केला.

ठळक मुद्दे गावपातळीवर शाळांचा दर्जा, गुणवत्ता सुधारण्यासाठी लोकप्रतिनिधी करत असलेल्या प्रयत्नांवरही पाणी फेरले, त्याचा निषेधही पांडे गुरुजी यांनी केला. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांनी खोटी माहिती सादर करणारांची तातडीने चौकशी करून कारवाई केली जाईल, असे सांगितले.

अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या करून शासनाने त्यामध्ये प्रचंड घोळ घातला आहे. त्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या अधिकाराचीही गळचेपी केली आहे. शासन स्तरावरूनच भ्रष्टाचार करण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी केला.शिक्षकांनी बदलीसाठी खोटी माहिती सादर केल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्या माहितीची तज्ज्ञांकडून पडताळणी न करताच शिक्षकांना बदली प्रक्रियेत लाभ देण्यात आला. त्या शिक्षकांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. विशेष म्हणजे, शाळांमध्ये शिक्षकांची बदली करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेचे होते. त्यावर शासनाने गदा आणली. तसेच गावपातळीवर शाळांचा दर्जा, गुणवत्ता सुधारण्यासाठी लोकप्रतिनिधी करत असलेल्या प्रयत्नांवरही पाणी फेरले, त्याचा निषेधही पांडे गुरुजी यांनी केला. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांनी खोटी माहिती सादर करणारांची तातडीने चौकशी करून कारवाई केली जाईल, असे सांगितले.दुधाळ जनावरे वाटपात पशुसंवर्धन विभागाकडून लाभार्थींकडून पैसे घेतल्यानंतरच लाभ दिला जातो. तसेच निवड करण्यासाठीही दलाल सक्रिय केले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांचा एकही लाभार्थी निवड केला जात नाही, गेल्या दोन महिन्यांपासून लाभार्थी याद्या दडवून ठेवल्या, असा आरोप माजी उपाध्यक्ष दामोदर जगताप यांनी केला.आलेगाव येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत इयत्ता आठवीला मंजुरी असताना खासगी शाळा असलेल्या शाहबाबू उर्दू स्कूलच्या मुख्याध्यापकाने तो वर्ग अवैध ठरवत पालकांना विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याचे पत्र दिले. हा प्रकार शासन, शिक्षण विभागाच्या आदेशांना आव्हान देणारा आहे. त्या मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी सदस्य गोपाल कोल्हे यांनी केली. चौकशीनंतर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. 

शिवाजी महाराज स्मारकाचे सौंदर्यीकरण करा!मूर्तिजापूर शहरातील जिल्हा परिषदेच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. ती जागा संबंधित मंडळाला द्या, अशी मागणी सदस्य सम्राट डोंगरदिवे यांनी केली. त्यावर नियमानुसार जागा देता येत नाही, असे सांगण्यात आले. मात्र, त्या जागेसह स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी दहा लाख रुपये द्या, ही मागणी डोंगरदिवे यांनी लावून धरल्याने निधीस मंजुरी देण्यात आली.

अकोला पंचायत समितीत बीडीओ आहे का...सभेत अकोला पंचायत समितीचे बीडिओ अनुपस्थित होते. यावेळी सभापती अरुण परोडकर यांनी पंचायत समितीला बीडीओ आहे का, याचे उत्तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी द्यावे, असे म्हटले. जनावरांचा डॉक्टर गटविकास अधिकारी म्हणून कसा दिला, असेही ते म्हणाले. त्यांचे म्हणणे कुणीही गांभीर्याने घेतले नाही. पेयजल योजनांच्या चौकशीबाबत रमण जैन यांनी विचारणा केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद