शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे अकोट मतदारसंघाची जबाबदारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:40 IST

गेल्या काही दिवसांपासून अकोट मतदारसंघात आमदार गोपीकिशन  बाजोरिया यांच्या फेर्‍या वाढल्या असून, त्यांची पावले आता अकोट विधानसभा  मतदारसंघाकडे वळली असल्याची चर्चा राजकीय वतरुळात सुरू आहे. अशा तच आता त्यांच्याकडे अकोट विधानसभा मतदारसंघ बांधणीची जबाबदारी  शिवसेनेच्यावतीने दिली असल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे. 

ठळक मुद्देभाजपच्या ताब्यातील मतदारसंघात मोर्चेबांधणी राजकीय वतरुळात चर्चा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गेल्या काही दिवसांपासून अकोट मतदारसंघात आमदार गोपीकिशन  बाजोरिया यांच्या फेर्‍या वाढल्या असून, त्यांची पावले आता अकोट विधानसभा  मतदारसंघाकडे वळली असल्याची चर्चा राजकीय वतरुळात सुरू आहे. अशा तच आता त्यांच्याकडे अकोट विधानसभा मतदारसंघ बांधणीची जबाबदारी  शिवसेनेच्यावतीने दिली असल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे. राज्यामध्ये सत्तेत असलेल्या भाजपा-शिवसेना या दोन पक्षातील शीतयुद्ध  कधीचेच संपले असून, हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात रणशिंग फुंकून  आगामी निवडणुकीची मार्चेबांधणी करीत आहेत. शिवसेनेने प्रत्येक विधानसभा  मतदारसंघनिहाय मोर्चेबांधणीसाठी जबाबदारी दिली असून, त्यामध्ये अकोट  विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार गोपिकिशन बाजोरिया यांच्याकडे  सोपविली आहे. अकोट हा मतदारसंघ सध्या भाजपाकडे आहे. येथून भाजपाचे  ज्येष्ठ आमदार प्रकाश भारसाकळे यांनी मागील निवडणुकीत शिवसेनेसह  विरोधकांचा पराभव करून, विजयाचा झेंडा रोवला होता. जिल्हय़ातील सर्वात  मोठी नगरपालिका असलेल्या अकोट या मतदारसंघात भाजपाचा वरचष्मा  आहे. यापूर्वी येथे सेनेचे संजय गावंडे हे आमदार होते. त्यांच्या पराभवानंतर  सेनेच्या वर्चस्वाला उतरती कळा लागली. त्यामुळे आता पुन्हा नव्या दमाने सेना उभारणीसाठी संपर्कप्रमुख खा. अरविंद  सावंत यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मोर्चेबांधणीची जबाबदारी  निश्‍चित केली आहे. आ. बाजोरिया यांनी यापूर्वी अकोला पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढविली  होती. त्यामध्ये त्यांना भाजपाकडून निसटता पराभव पत्कारावा लागला. मात्र,  विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून तिसर्‍यांदा विजयी होत,  त्यांनी पक्षातील आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. गेल्या शुक्रवारीच अकोट नगर परिषदेच्या समस्यांबाबत प्रशासकीय  कामकाजाचा आढावा घेतला होता, तर अकोटकडे जाणार्‍या राज्य मार्गाच्या  दुरुस्तीसाठी अल्टिमेटम देऊन अकोट येथील जनतेच्या जिव्हाळय़ाच्या प्रश्नांना  हात घातला. तसेच अकोट शहरासाठी तयार केलेल्या विकास आराखड्यात  आवश्यक बदल करून, मुंबईत बैठक लावण्याचे आश्‍वासन आ. बाजोरिया  यांनी दिले. पुरवणी कर आकारणीमधील अपिलापासून वंचित राहिलेल्या  मालमत्ताधारकांना संधी देऊन त्यांचे आक्षेप निकाली काढण्याचे निर्देश मु ख्याधिकारी गीता ठाकरे यांना दिले. बाजोरिया यांचा अकोटमधील वाढता राब ता, सध्या राजकीय वतरुळात चर्चेचा विषय बनला आहे. अशातच आता  विधानसभा मोर्चेबांधणीची जबाबदारी त्यांच्यावर आल्याने पुढील विधानसभा  निवडणुकीची तयारी तर नव्हे ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

टॅग्स :Gopikishan Bajoriaगोपीकिशन बाजोरीयाakotअकोट