शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

Good News : ९३ कोरोना संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 11:11 IST

शनिवारी ९३ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त झाले असून, ते सर्व निगेटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्देकोरोना संसर्गाला शनिवार, १६ मे रोजी प्रथमच ‘ब्रेक’ लागला. तब्बल ९३ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह.

अकोला : मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच प्रचंड वेग घेतलेल्या कोरोना संसर्गाला शनिवार, १६ मे रोजी प्रथमच ‘ब्रेक’ लागला असून, तब्बल ९३ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची दिलासादायक बातमी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. शनिवारी ९३ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त झाले असून, ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. ही दिलासादायक बाब असली, तरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २१८ वर असल्याने आणि आणखी १०१ रुग्ण आयसोलेशन कक्षात दाखल असल्याने धोका टळलेला नाही.पश्चिम विदर्भात सर्वाधिक कोरोना रुग्ण अकोल्यात असून, नागपूरनंतर विदर्भात अकोल्याचा दुसरा क्रमांक लागतो. सहा एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळलेल्या अकोल्यात दीड महिन्यातच दोनशेचा टप्पा ओलांडून कोरोनाबाधितांची संख्या १५ मे पर्यंत २१८ वर गेली असून, मृतकांचा आकडाही १६ झाला आहे. या पृष्ठभूमीवर शनिवार, १ मे रोजी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडून ९३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यामधील सर्वच अहवाल निगेटिव्ह असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. आणखी काही अहवाल प्रलंबित असल्याने सायंकाळच्या अहवालाकडे अकोलेकरांचे लक्ष लागलेले आहे. जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोना चाचणीचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आतापर्यंत एकूण २१८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

गुरुवार व शुक्रवारी आणखी दोन महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतकांची संख्या १६ झाली आहे. दरम्यान, एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केल्याची नोंद आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या एकूण मृत्यूचा आकडा हा १७ असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. आतापर्यंत एकूण १०० जणांनी कोरोनावर मात केली असून, सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन कक्षात १०१ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडू देण्यात आली.आज प्राप्त अहवालाची स्थितीप्राप्त अहवाल-९३पॉझिटीव्ह-शून्यनिगेटीव्ह-९३आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल- २१८मयत-१७(१६+१), डिस्चार्ज- १००दाखल रुग्ण(अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- १०१

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या