शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

आखातवाड्याच्या वृत्तिकाची स्वर्णिम कामगिरी

By admin | Updated: November 18, 2014 23:07 IST

४२ वी महाराष्ट्र राज्य जुदो अजिंक्यपद- २0१४ स्पर्धा, ३0 किलो वजनगटात प्रथम स्थान.

अँड. नीलिमा शिंगणे /अकोला

            उस्मानाबाद येथे झालेल्या ४२ व्या महाराष्ट्र राज्य जुदो अजिंक्यपद- २0१४ स्पर्धेत आखातवाडा येथील वृत्तिका रमेश ढगे हिने अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करीत ३0 किलो वजनगटात सब-ज्युनिअर गटात प्रथम स्थान पटकावित सुवर्णपदकावर ताबा मिळविला. वृत्तिकाच्या स्वर्णिम कामगिरीसाठी आयोजकांनी तिचा बेस्ट जुदोका पुरस्कार देऊन गौरव केला. मागील वर्षी वृत्तिकाने दिल्ली येथे झालेल्या ५९ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात जुदो प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत उत्कृष्ट प्रदर्शन केले. आखातवाडा या छोट्याशा गावात कोणतीही अत्याधुनिक क्रीडासुविधा नसताना वृत्तिकाने स्वबळावर सुवर्णपदकाचा वेध घेतला, हे येथे उल्लेखनीय आहे. याआधी तिने औरंगाबाद येथे जानेवारी २0१२ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत कांस्यपदक, नाशिक येथे ऑक्टोबर २0१२ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत परत कांस्यपदक, औरंगाबाद येथे २0१३ मध्ये झालेल्या राज्यस् तरीय स्पर्धेत पुन्हा कांस्यपदक आणि मुंबई येथे डिसेंबर २0१३ मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. जानेवारी २0१४ मध्ये तिने महाराष्ट्राचे प्र ितनिधित्व करीत दिल्लीत अमरावती विभागाचे नाव झळकाविले. सप्टेंबर २0१४ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत पुन्हा एकदा सुवर्णपदक तिने कमाविले. सुवर्ण पदकासह बेस्ट जुदिका हा बहुमान मिळविला. ३१ ऑक्टोबर २0१४ रोजी नंदुरबार येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत वृत्तिकाला चांगले प्रदर्शन करूनदेखील कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. दर्यापूरातील रत्नाबाई राठी विद्यालयात आठव्या वर्गात शिकणार्‍या वृत्तिकाने अल्पवयातच स्वबळावर यशस्वी कामगिरी बजावली. ऑलिम्पिक स्पर्धेत भार ताचे प्रतिनिधित्व करण्याचे तिचे स्वप्न असून, त्यासाठी अधिकाधिक मेहनत करी त असल्याचे ह्यलोकमतह्णला तिने सांगितले. वृत्तिकाला सभ्यता स्पोर्ट्स क्लबचे प्रा. राजेंद्र पारडे, प्रफुल्ल खोडके, डॉ. आर. एस. पठाण, राजेंद्र राणे, उमेश पाटील यांच्यासह आई-वडील व आजी-आजोबा यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते.