शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचे सोने खरेदी करण्याचा प्रयत्न करणारा सराफा मोकाटच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 13:45 IST

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला; मात्र सदर सराफा अद्याप मोकाट असून, पोलीस गांधी रोडवरील या सराफाविरुद्ध पुरावे गोळा करीत असल्याची माहिती आहे.

अकोला: रायगड जिल्ह्यातील तीन घरफोड्यांतील चोरी केलेले सोने रायगड जिल्ह्यातीलच चोरटा अकोल्यातील गांधी रोडवरील एका सराफाकडे विक्रीसाठी आल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला; मात्र सदर सराफा अद्याप मोकाट असून, पोलीस गांधी रोडवरील या सराफाविरुद्ध पुरावे गोळा करीत असल्याची माहिती आहे. या चोरट्याने सदरचे सोने गांधी रोडवरील एका सराफाला विकण्यासाठी आणल्याची कबुली पोलिसांना दिली होती.कोकणातील रायगड जिल्ह्यात तीन ठिकाणी मोठ्या चोऱ्या केल्यानंतर प्रसाद जगन्नाथ पाटील नामक २६ वर्षीय चोरटा या तीन चोरीतील सोने विक्री करण्यासाठी गांधी रोडवरील एका सराफाकडे आला होता. तीन चोऱ्यांमध्ये लाखो रुपयांचे सोने चोरी केल्यानंतर अर्ध्या किमतीमध्ये हे सोने खरेदी-विक्रीचा डाव रचण्यात आला; मात्र सदर चोरट्याची माहिती अकोला पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी चोरट्यावर पाळत ठेवली व त्याला अटक केली होती. त्याची कसून चौकशी करून झाडाझडती घेतली असता या चोरट्याकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे १६ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. त्यानेच हे सोने गांधी रोडवरील एका सराफाकडे विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गांधी रोडवरील या चोरीचे सोने खरेदी करणाºया चोरट्या सराफाचा शोध सुरू केल्याची माहिती आहे.बाळापुरातील दोन सराफाही सुटले!बाळापुरातील दोन सराफांना अकोला पोलिसांनी चोरीचे सोने खरेदी-विक्रीच्या संशयावरून ताब्यात घेतले होते; मात्र त्यानंतर सदर सराफांना सोडण्यात आल्याची माहिती आहे. या दोन सराफांना चोरट्याच्या माहितीवरूनच ताब्यात घेतले होते; मात्र दोन दिवस ताब्यात ठेवून या सराफांना सोडण्यात आले होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी