उरळ: येथून जवळच असलेल्या पारस शेतशिवारातील एका घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या गहू पोतीसह एकूण १९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवार १२ मे रोजी मध्यरात्री घडली. या प्र्रकरणी उरळ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यातील जानेफळ येथील मूळ रहिवासी शेषराव काशीराम खरात हे सध्या पारस शेतशिवारात राहत असून, सोमवार १२ मे रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून ३ ग्रॅम वजनाची सोन्याची साधी पोत आणि ४ ग्रॅम वजनाची गहू पोत असे १८ हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने, तसेच कपडे मिळून एकूण १९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी शेषराव खरात यांनी दिलेल्या तक्र ारीवरून उरळ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंविच्या कलम ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास हेकाँ श्रीकृष्ण डांगे करीत आहेत. (वार्ताहर)
सोन्याच्या दागिन्यांची चोरी
By admin | Updated: May 13, 2014 20:22 IST