शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सापांच्या दैवतीकरणामुळे त्यांचा जीव धोक्यात - बाळ काळने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 12:15 IST

नागपंचमीच्या निमित्ताने रविवार, ४ आॅगस्ट रोजी बाळ काळणे यांनी ‘लोकमत’शी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी चर्चा करताना सापांविषयी असलेले समज-गैरसमज याविषयी विस्तृत माहिती दिली. 

अकोला : साप हा शेतकºयांचा मित्र असून, निसर्ग संतुलनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो; पण धार्मिकतेच्या नावाखाली सापांचे दैवतीकरण करण्यात आले. पूजन करून त्यांना दूध पाजण्यात येते; मात्र सापांच्या अशा दैवतीकरणामुळे त्यांचा जीव धोक्यात आला आहे. नागपंचमीच्या निमित्ताने रविवार, ४ आॅगस्ट रोजी बाळ काळणे यांनी ‘लोकमत’शी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी चर्चा करताना सापांविषयी असलेले समज-गैरसमज याविषयी विस्तृत माहिती दिली. 

प्र.  नागपंचमीला सापाला दूध पाजणे योग्य आहे का?बाळ काळणे - नागपंचमीला नागरिक मोठ्या आस्थेने सापाला दूध पाजतात; पण दूध हे सापाचे अन्न नाही. साप पूर्णत: मांसाहारी असून, दूध प्यायल्याने सापांचा जीव धोक्यात सापडतो. साप हा निसर्गाचे संतुलन राखत असल्याने तो शेतकºयांचा मित्रच समजला जातो; पण नागपंचमीच्या नावावर त्याला दूध पाजण्याची प्रथा आजही ग्रामीण भागात दिसून येते ती चुकीचीअसल्याचे बाळ काळणे यांनी  सांगितले. 

प्र. वारुळाचे पुजन करण्याची प्रथा योग्य आहे का ?बाळ काळणे - शहरात हा प्रकार कमी झाला असला, तरी शहरालगतच्या भागासह दुर्गम भागात वारुळाचे पूजन आजही केले जाते. यात काही गैर नाही किंवा त्याला विरोधही नाही. हो धार्मिक सणांशी निसर्ग संतुलनाची सांगड असल्याने हे व्हायला हवे; पण आपल्या कुठल्याही कृत्यामुळे सापांच्या प्रजातीच नष्ट होण्याच्या मार्गावर जात असेल, तर या प्रथा बंदच झालेल्या बºया.

प्र. सापांच्या संरक्षणासाठी काय करावे?बाळ काळणे -  साप हा शेतकºयांचा मित्र असून, निसर्ग संतुलनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो; पण धार्मिकतेच्या नावाखाली सापांचे दैवतीकरण करण्यात आले. निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी मानव जातीप्रमाणेच सापांच्या प्रजातीही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाने सापांच्या रक्षणासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यामुळे सण साजरे करा; मात्र सापांचे दैवतीकरण करून त्यांचा जीव धोक्यात टाकू नका, असे आवाहन यानिमित्ताने त्यांनी नागरिकांना केले. 

कर्करोगाशी लढत देतानाच सापांना जीवनदानसर्पमित्र बाळ काळणे यांना डिसेंबर २०१८ मध्ये कर्करोग असल्याचे निदान झाले. कर्करोग असल्याचे कळताच पायाखालची जमीनच सरकली होती. या अवस्थेत असतानाही त्यांनी वन्यजीव संरक्षणाचे कार्य मोठ्या जिद्दीने अन् खंबीरतेने सुरू ठेवले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कर्करोगावर मात करीत सापांसोबतच इतर वन्य प्राणी व पक्ष्यांचे प्राण वाचविणारे ते राज्यातील एकमेव सर्पमित्र असावेत. 

टॅग्स :Akolaअकोलाsnakeसाप