शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गोरक्षण मार्गावरील वृक्षाला मिळाली नवसंजीवनी!

By admin | Updated: July 11, 2017 01:41 IST

विकास पर्वाला एक नवी दिशा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गोरक्षण मार्ग रुंदीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ झाला आहे. दरम्यान, विकास कार्यात अडथळा असलेले वृक्ष पूर्णत: तोडले जात आहेत. सोमवारी अशाच एका धाराशायी होणाऱ्या वृक्षाला काही निसर्गप्रेमींनी पुनरुज्जीवन दिले. मुलीच्या जन्माप्रीत्यर्थ शशिकांत हांडे यांनी १७ वर्षांपूर्वी एक बदामाचे रोपटे लावले. रोपट्याचे रूपांतर मोठ्या वृक्षात झाले. जिवापाड जपलेला वृक्ष आता धाराशायी होणार ही जाणीव होताच, शशिकांत हांडे यांनी स्वखर्चाने त्याचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पुढील कारवाई थांबविण्याची विनंती करून, त्यांनी वृक्षाला नवीन ठिकाणी स्थानांतरित करण्यासाठी ‘जेसीबी’ची व्यवस्था केली. मुळासकट काढलेल्या वृक्षाच्या प्रारंभी मोठ्या फांद्या कापण्यात आल्या. तद्नंतर जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याच्या पलीकडील खुल्या जागेवर खोल खड्डा करण्यात आला. मोठ्या फांद्या विलग केल्या असल्यामुळे मुळासकट काढण्यात आलेला बदामाच्या वृक्षाचे पुनर्रोपण करण्यास वेळ लागला नाही. तत्काळ जवळच राहणारे सेंट्रल बँकेचे निवृत्त अधिकारी सोनवणे यांनी वृक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली. या कार्यात हांडे यांना निसर्गप्रेमी प्रदीप गुरूखुद्दे, मधू जाधव, महेश चांडक, काटोले यांचे सहकार्य लाभले. शहराचा विकास करताना अनेक वर्षांपासून उभे असलेले वृक्ष भुईसपाट केले जात आहेत; मात्र या निसर्गप्रेमींनी विकास पर्वाला एक नवी दिशा देणारे उदाहरण सर्व अकोलेकरांसमोर ठेवले आहे.