शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या अतिगंभीर रुग्णांसाठी ‘जीएमसी’ला मिळाले २५ व्हॉव्हेल्स इंजेक्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 13:00 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राणरक्षक असलेले २५ ‘व्होव्हेल्स’ इंजेक्शन प्राप्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्याच्या तुलनेत जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्युदर जास्त आहे. यावर नियंत्रण मिळविण्याचे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे. अशातच शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राणरक्षक असलेले २५ ‘व्होव्हेल्स’ इंजेक्शन प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्युदर कमी करण्यासाठी आता प्रभावी औषधांचा वापर सुरू होणार आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत दाखल झालेल्या जवळपास ९० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत; मात्र इतर जिल्ह्याच्या तुलनेत जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्युदर जास्त आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये अतिगंभीर रुग्णांची संख्या जास्त होती. शिवाय हे रुग्ण उशिरादेखील दाखल झाले होते. या रुग्णांमध्ये कोरोना व्यतिरिक्त इतरही गंभीर आजार होते. अशा परिस्थितीत त्यांचा जीव वाचविणे आरोग्य यंत्रणेपुढे मोठे आव्हान आहे.जिल्ह्यातील कोरोनाचा हा मृत्युदर रोखण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यामार्फत जिल्ह्यासाठी २५ ‘व्हॉव्हेल्स’ इंजेक्शन उपलब्ध झाले आहेत.जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी हे इंजेक्शन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच जीएमसीचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्युदर कमी करण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर आहे. त्या दृष्टिकोनातून प्रभावी औषधांचा उपयोग करण्यावर भर असणार आहे. शासनाकडून २५ ‘व्हॉव्हेल्स’ इंजेक्शन जीएमसीला प्राप्त झाले. या व्यतिरिक्त जीएमसी स्तरावर इतरही इंजेक्शन आणि औषध खरेदी करण्याचे विचाराधीन आहे.- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला

 

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्या