शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनासाठी जीएमसीत आयसुलेट वार्ड; पण सुरक्षेचं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 16:36 IST

Coronavirus : सर्वोपचार रुग्णालयातील जुन्या टीबी वॉर्डात कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र आयसुलेट वार्ड तयार करण्यात आला आहे.

अकोला : कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांसाठी अकोल्यात स्वतंत्र आयसुलेट वॉर्ड सुरू करण्यात आला; मात्र येथे नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचं काय? नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणाºया आरोग्य विभागाकडून येथे नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले आहे.सर्वोपचार रुग्णालयातील जुन्या टीबी वॉर्डात कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र आयसुलेट वार्ड तयार करण्यात आला आहे. हा वॉर्ड विभागातील पाचही जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांसाठी आहे. त्या अनुषंगाने येथे दहा खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय, सहा परिचारिकांचीही प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे; मात्र कोरोना व्हायरसचा संसर्ग एकापासून दुसºयापर्यंत थेट पसरत असल्याने योग्य सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. तसे आवाहनदेखील आरोग्य विभागाकडून केले जात आहे; परंतु नागरिकांना आवाहन करताना येथे नियुक्त कर्मचाºयांच्या सुरक्षेकडेच आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे वास्तव आहे. रुग्णांवर उपचार करत असताना वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांना संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे इतरांना आवाहन करत असताना आरोग्य विभागाने येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांना सुरक्षा साधनं पुरवणे आवश्यक आहे.सुरक्षा साधनांची खरेदी नाहीचकोरोना आयसुलेट वॉर्डात रुग्णसेवा देणाºया कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा साधनांची गरज आहे. सद्यस्थितीत जीएमसीत कुठल्याच प्रकारची सुरक्षा साधने उपलब्ध नाहीत; मात्र दोन दिवसात मास्क, गाऊन, बुटांची खरेदी केली जाणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी सांगितले होते; मात्र अद्यापही आरोग्य विभागातर्फे सुरक्षा साधनांची खरेदी करण्यात आलेली नाही.कोरोना व्हायरसने ग्रस्त रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या आयसुलेट वार्डात दहा खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, सहा परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय, येथे कार्यरत कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठी मास्क, गाऊन, बुटांची खरेदी केली जाणार आहे.- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला.

 

टॅग्स :corona virusकोरोनाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय