शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

'जीएमसी'त ३० खाटांचा स्वतंत्र ‘कान-नाक-घसा’ वॉर्ड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 13:30 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील ‘कान-नाक-घसा’ विभागाचा स्वतंत्र वॉर्ड प्रस्तावित आहे.

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील ‘कान-नाक-घसा’ विभागाचा स्वतंत्र वॉर्ड प्रस्तावित आहे. ३० खाटा क्षमता असलेला हा वॉर्ड नवीन मर्च्युरी इमारतीलगत राहणार असून, लवकरच नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे.सध्याच्या टीबी वॉर्डाच्या जागेत शवविच्छेदन कक्षाचे विस्तारीकरण करण्यात येणार असून, या ठिकाणी नव्याने इमारत उभारण्यात येणार आहे. त्यामुळे गत आठवड्यात क्षयरोग वॉर्डचे स्थलांतरण वॉर्ड क्रमांक २८ मध्ये करण्यात आले. या ठिकाणी ‘श्वसनरोग शास्त्र आणि क्षयरोग’ या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी क्षयरोग विभागाचा विस्तार करण्यात आला आहे. क्षयरोग वॉर्डाची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी प्रस्तावित शवविच्छेदन कक्षाची नवी इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीला लागूनच कान-नाक-घसा विभागाची नवी अत्याधुनिक इमारत उभारण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून मंजूर निधी प्राप्त झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अकोल्यासह शेजारील जिल्ह्यातील रुग्णांना ‘कान-नाक-घसा’ शी निगडित विविध आजारांवर अद्ययावत उपचार मिळणे शक्य होणार आहे.‘ईएनटी’ला मिळणार ‘पीजी’ची मान्यताजानेवारी २०२० च्या पहिल्याच आठवड्यात ‘एमसीआय’चे पथक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देण्याची शक्यता आहे. यावेळी पथकाद्वारे ‘कान-नाक-घसा’ विभागाचे मूल्यांकन करण्यात येणार असून, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पाच जागांना मान्यता देण्याची शक्यता आहे. या संदर्भात महत्त्वाची प्रक्रिया जीएमसी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. गत आठवड्यात एमसीआयने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ‘श्वसनरोग शास्त्र आणि क्षयरोग’ या विषयासाठी एमसीआयने ‘पीजी’ला मान्यता दिली होती. ‘ईएनटी’ला पीजीची मान्यता मिळाल्यास जीएमसीमध्ये पीजीच्या एकूण जागा ४० वर पोहोचणार आहेत.कान-नाक-घसा विभागाच्या नव्या इमारतीला अजून, काही वेळ असला, तरी लवकरच पीजीची मान्यता मिळणार आहे. यासाठी एमसीआयचे पथक जानेवारीमध्ये पाहणीसाठी येण्याची शक्यता आहे.- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय