शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

'जीएमसी' अकोला : चौकशी समिती बरखास्त केल्यानंतर अधिपरिचारिकांचे आंदोलन मागे 

By atul.jaiswal | Updated: March 12, 2018 17:04 IST

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सेवारत असलेल्या महिला डॉक्टर व अधिपरिचारिका यांच्यातील वैयक्तिक वादावरून अधिसेविका व संबंधित अधिपरिचारीकेला महाविद्यालय प्रशासनाकडून बजावण्यात आलेली नोटीस मागे घेतानाच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गठीत करण्यात आलेली चौकशी समिती अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सोमवारी बरखास्त केल्यानंतर अधिपरिचारिकांनी त्यांचे कामबंद आंदोलन मागे घेतले.

ठळक मुद्देडॉ. वैशाली कोटंबकर (कोरडे)आणि अधिपरिचारिका जयश्री भदे (लाखे) यांच्यात बुधवार, ७ मार्च रोजी गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून झालेला वाद पोलिस ठाण्यात पोहचला होता. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी डॉ. कार्यकर्ते यांनी चौकशी समिती गठीत करतानाच अधिपरिचारिका जयश्री भदे व अधिसेविका ग्रेसी मरीयम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सोमवारी सकाळी अधिपरिचारिकांनी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या देऊन कामबंद आंदोलनाचा इशारा दिला.

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सेवारत असलेल्या महिला डॉक्टर व अधिपरिचारिका यांच्यातील वैयक्तिक वादावरून अधिसेविका व संबंधित अधिपरिचारीकेला महाविद्यालय प्रशासनाकडून बजावण्यात आलेली नोटीस मागे घेतानाच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गठीत करण्यात आलेली चौकशी समिती अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सोमवारी बरखास्त केल्यानंतर अधिपरिचारिकांनी त्यांचे कामबंद आंदोलन मागे घेतले.वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील सहयोग प्राध्यापक डॉ. वैशाली कोटंबकर (कोरडे)आणि अधिपरिचारिका जयश्री भदे (लाखे) यांच्यात बुधवार, ७ मार्च रोजी गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून झालेला वाद पोलिस ठाण्यात पोहचला होता. परस्पर विरोधी तक्रारींवरून गुन्हाही दाखल झाला. दरम्यान, या प्रकरणी डॉ. वैशाली कोटंबकर यांनी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी डॉ. कार्यकर्ते यांनी चौकशी समिती गठीत करतानाच अधिपरिचारिका जयश्री भदे व अधिसेविका ग्रेसी मरीयम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. वैयक्तिक स्वरुपाच्या वादात महाविद्यालय प्रशासनाने हस्तक्षेप केल्यामुळे अधिपरिचारिकांच्या संघटनेने ग्रेसी मरीयम यांच्याविरुद्धची कारणे दाखवा नोटीस मागे घ्यावी, तसेच अधिसेविका जयश्री भदे यांना बजावलेली नोटीस रद्द करण्याची मागणी करीत शनिवारी काळ्या फिती लावून आंदोलन केले. सोमवारी सकाळी अधिपरिचारिकांनी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या देऊन कामबंद आंदोलनाचा इशारा दिला. अखेर डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी या प्रकरणी गठीत केलेली चौकशी समिती बरखास्त करून अधिसेविका ग्रेसी मरियम यांच्या विरुद्ध बजावलेली कारणे दाखवा नोटीस मागे घेत असल्याचे पत्र दिले. त्यानंतर अधिपरिचारिकांनी आपले आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला.अधिपरिचारिका व सहयोगी प्राध्यापक यांच्यातील वाद हा वैयक्तिक स्वरुपाचा असून, दोघींनीही परस्परांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आम्ही या प्रकरणी संबंधितांना बजावलेल्या नोटीस मागे घेतल्या व चोकशी समितीही गुंडाळली आहे. रुग्णसेवा अविरत सुुरु ठेवण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

- डॉ. राजेश कार्यकर्ते, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय