शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाविरुद्धच्या लढाईत ‘जीएमसी’ अ‍ॅक्शन मोडवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 10:31 IST

कोविडच्या रुग्णांना पोषक आहारासोबतच त्यांच्या तक्रारी तत्काळ निवारणासाठी रुग्णालय प्रशासनातर्फे कार्यपद्धतीमध्ये बदल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून, त्याचा संपूर्ण ताण सर्वोपचार रुग्णालयावर आला आहे. अशा परिस्थितीत कोरोना विरुद्धच्या लढाईत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. कोविडच्या रुग्णांना पोषक आहारासोबतच त्यांच्या तक्रारी तत्काळ निवारणासाठी रुग्णालय प्रशासनातर्फे कार्यपद्धतीमध्ये बदल केला आहे. त्यानुसार, अतिजोखमीच्या रुग्णांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने आपल्यालाही कोरोनाची लागण तर होणार नाही, ना या भीतीने अनेक रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात जाण्यास टाळत आहेत. तर ज्यांना कोविडची लक्षणे आहेत, असेही रुग्ण येथील परिस्थितीमुळे दाखल होण्यास टाळत आहेत. लोकांच्या मनातील हीच भीती घालवण्यासाठी ‘जीएमसी’ प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. रुग्णसेवा प्रभावी राबविण्यासाठी विभाग प्रमुखांच्या चार समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या समित्यांकडे विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने रुग्णांच्या तक्रारीपासून, तर त्यांना मिळणाºया सुविधांच्या योग्य नियोजनासंदर्भात विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रतिमा उंचावण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे या समित्यांच्या कामावर लक्ष राहणार आहे.रुग्णांच्या आहाराच्या गुणवत्तेवर राहणार विशेष लक्ष!सर्वोपचार रुग्णालयात दाखल कोविडच्या बहुतांश रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब यासह इतर जोखमीचे आजार आहेत. अशा रुग्णांना आहार तज्ज्ञांच्या सांगण्यानुसारच आहार दिला जात आहे. इतर रुग्णांसह अतिजोखमीच्या रुग्णांसाठी दिल्या जाणाºया आहाराची गुणवत्ता राखण्याची जबाबदारीदेखील यातील एका समितीवर आहे.

कोरोनाची लक्षणे आढळल्यास रुग्णांनी त्वरित सरकारी रुग्णालयाशी संपर्क साधावा. वेळेवर उपचार घेतल्याने कोरोना पूर्णपणे बरा होतो. सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांवर चांगला उपचार व्हावा, यासाठी विशेष लक्ष दिले जात असून, कार्यपद्धतीमध्येही बदल करण्यात येत आहेत.- डॉ मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

 

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयAkolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या