शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गतीमंद मुलीसोबत दुष्कृत्य करणाऱ्यास कठोर शिक्षा करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 13:21 IST

गतिमंद मुलीवर दुष्कर्म करणाºया नराधमास कठोर शिक्षा व्हावी व ही शिक्षा देण्यासाठी शासनाने हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, अशी मागणी अखिल भारतीय बारी महासंघातर्फे शुक्रवारी गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

अकोला : संग्रामूपर तालुक्यातील वानखेड येथील गतिमंद मुलीवर दुष्कर्म करणाºया नराधमास कठोर शिक्षा व्हावी व ही शिक्षा देण्यासाठी शासनाने हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, अशी मागणी अखिल भारतीय बारी महासंघातर्फे शुक्रवारी गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.वानखेड (जि.बुलडाणा) येथे शनिवारी (ता.८) प्रकाश लोणे या नराधमाने १८ वर्षीय गतिमंद मुलीसोबत दुष्कर्म केले. तसेच कुठेही वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीसुद्धा दिली. आईवडील घरी आल्यानंतर या घाबरलेल्या मुलीबाबत त्यांना प्रकार समजला. भितीपोटी त्यांनी घटनेच्या दिवशी तक्रार दिली नाही. मात्र दुसºया दिवशी त्यांनी पोलिस ठाणे गाठत प्रकाश लोणे याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. त्याच रात्री पोलिसांनी आरोपिला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता सुरुवातीला पोलिस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. हे प्रकरण प्रत्येक समाजासाठी लाच्छंनास्पद असून आरोपींना जरब बसविण्यासाठी या प्रकरणात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी समाज बांधवांनी डॉ. पाटील यांच्याकडे केली. यावेळी अखिल भारतीय बारी महासंघाचे संस्थापक रमेशचंद्र घोलप, अकोला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाषराव रौंदळे, राजू पाटील, अमोल ढगे, नारायण ढगे, सुभाषराव हागे, श्याम डाबरे, वरवट बकाल सरपंच श्रीकृष्ण दातार, संतोष टाकळकार, वासुदेव रौंदळे, अशोक टाकळकर, संदीप दामधर, ज्ञानेश्वर हागे, राजेंद्र हागे, उमेश भोपळे, मनोज हागे, अमोल रौंदळे, सचिन हागे, गोपाल धुळे, दीपक हागे, विजय हागे, शुभम ढगे, यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील