शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना सरसकट तातडीने मदत द्या! जिल्हा परिषदेच्या सभेत ठराव मंजूर

By संतोष येलकर | Updated: September 19, 2022 17:33 IST

सभेत मंजूर झालेला ठराव शासनाकडे पाठविणार

अकोला: संततधार पाऊस आणि अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी संकटात सापडला आहे.त्यामुळे शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट तातडीने पीक नुकसानीची मदत द्यावी, अशा मागणीचा ठराव सर्वानुमते जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी मंजूर करण्यात आला. हा ठराव शासनाकडे पाठविण्याचेही सभेत ठरविण्यात आले.

यंदाच्या पावसाळ्यात सतत पाऊस, अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी महिला व बालकल्याण सभापती स्फूर्ती गावंडे यांनी सभेत केली. तसेच जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने चार हेक्टर मर्यादेपर्यंत पीक नुकसानीची मदत देण्याची मागणी जिल्हा परिषदेतील  शिवसेना गटनेता गोपाल दातकर यांनी केली.

पाऊस आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.  या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने मंजूर केलेली १३० कोटी रुपयांची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, यादृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट तातडीने पीक नुकसानीची मदत देण्यात यावी, अशी मागणी करणारा ठराव सत्तापक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांनी सभेत मांडला. हा ठराव सर्वानुमते सभेत मंजूर करण्यात आला. मंजूर करण्यात आलेला ठराव शासनाकडे पाठविण्याचेही सभेत ठरविण्यात आले.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती