शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

निराधार महिलांना बीपीएल शिधापत्रिका द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:54 IST

शेतकरी आंदोलन; दिल्लीकडे रवाना अकोला : नवीन कृषी कायदे रद्द करावे यासाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या कास्तकारांना पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी ...

शेतकरी आंदोलन; दिल्लीकडे रवाना

अकोला : नवीन कृषी कायदे रद्द करावे यासाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या कास्तकारांना पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी जिल्ह्यातील शेतकरी किसान विकास मंचच्या माध्यमातून दिल्लीकडे रवाना हाेणार आहेत. दुपारी १२ वाजता अशोक वाटिका परिसरातून शेतकरी राजधानीकडे कूच करतील.

जलवाहिनीची जाेडणी अंतिम टप्प्यात

अकाेला : पूर्व प्रभागातील महाजनी प्लाॅट येथील जलकुंभातून पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर तीन दिवसांपूर्वी जाेडणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली हाेती. अमृत अभियानांतर्गत जलवाहिनीचे जाळे अंथरल्या जात आहे. जाेडणीचे काम जलद गतीने सुरू असून, मंगळवारी पूर्व प्रभागातील पाणीपुरवठा सुरू हाेण्याची शक्यता आहे.

रस्त्यावर धुरळा; मनपा सुस्त

अकाेला : शहरातील प्रमुख रस्त्यांचे निर्माण कार्य सुरू असून, अशाेक वाटिका ते मदनलाल धिंग्रा चाैक पुढे टाॅवर चाैकापर्यंतच्या मार्गावर उड्डाणपुलाच्या कामामुळे मातीचा धुरळा उडत आहे. मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी या भागात दैनंदिन साफसफाई करणे क्रमप्राप्त आहे. तसेच उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने पाण्याचा शिडकाव करणे भाग आहे.

भाजीबाजारात घाणीचे साम्राज्य

अकाेला : जुने शहरातील शिवाजीनगर परिसरातील भाजीबाजारात व्यावसायिकांकडून सडका भाजीपाला उघड्यावर फेकला जात असल्याचे चित्र आहे. भाजीबाजारालगत महापालिकेच्या पश्चिम झाेनचे कार्यालय असूनही भाजीबाजारातील अस्वच्छतेकडे लक्ष दिले जात नसल्याचे दिसत आहे. यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे.

तापडिया नगरातील नाला तुंबला

अकाेला : मनपाच्या आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांना प्रशासकीय प्रभागातील तसेच खासगी सफाई कर्मचाऱ्यांना पडीक प्रभागातील नाले, सार्वजनिक जागा, रस्त्यांची साफसफाई करण्याची जबाबदारी साेपविण्यात आली आहे; परंतु सफाई कर्मचाऱ्यांवर मनपाच्या आराेग्य निरीक्षकांचे नियंत्रण नसल्यामुळे तापडिया नगर येथील माेहन भाजी भंडारजवळ मुख्य नाला व गटार तुंबल्या आहेत.

अपघातानंतरही पथदिवे बंदच

अकाेला : शहरातील नेहरू पार्क चाैकात शनिवारी ट्रकच्या धडकेत उमरी परिसरातील इसमाचा मृत्यू झाला हाेता. या ठिकाणी मनपाच्या वतीने एलईडी पथदिवे उभारण्यात आले असले तरी यातील बहुतांश दिवे बंद असल्याचे समाेर आले आहे. अपघातात इसमाला जीव गमवावा लागला असला तरी पथदिवे दुरुस्तीकडे मनपाचे दुर्लक्ष हाेत आहे.

साेशल डिस्टन्सिंगला ‘खाे’

अकाेला : शहरात काेराेना विषाणूची लागण झालेल्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत चालली आहे. काेराेनाची दुसरी लाट येण्याची शक्यता पाहता नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे अपेक्षित असताना बाजारात विविध साहित्य खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगचा विसर पडल्याचे दिसत आहे. ताेंडाला मास्क, रुमाल न बांधताच नागरिक घराबाहेर पडत आहेत.

शाळेजवळ कचऱ्याचे ढीग

अकाेला : अकाेटफैल परिसरातील पाेलीस स्टेशनसमाेर मनपा हिंदी मुलांची शाळा असून, शाळेच्या मुख्य रस्त्यालगत उघड्यावर कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. परिसरातील नागरिक उघड्यावर कचरा फेकतात. घंटागाडीत कचरा जमा न करता उघड्यावर अस्वच्छता निर्माण करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे.

अभय याेजनेला अल्प प्रतिसाद

अकाेला: शहरातील मालमत्ताधारकांकडे थकबाकी असेल तर त्यांना नियमानुसार दाेन टक्के शास्तीचा दंड आकारला जाताे. मागील तीन वर्षांपासून सत्ताधारी भाजपने शास्ती अभय याेजनेला वारंवार मुदतवाढ देण्याचे निर्देश मनपाला दिले. त्यानंतरही या याेजनेला अकाेलेकरांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे मनपाने नमूद केले आहे.