शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘सीबीएसई’ बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 12:31 IST

अकोला : सीबीएसई इयत्ता बारावीचा निकाल २ मे रोजी दुपारी घोषित झाला असून, या निकालामध्ये अकोला आणि वाशिम जिल्ह्यात मुलींनी बाजी मारली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सीबीएसई इयत्ता बारावीचा निकाल २ मे रोजी दुपारी घोषित झाला असून, या निकालामध्ये अकोला आणि वाशिम जिल्ह्यात मुलींनी बाजी मारली आहे. यात वाशिम जिल्ह्यातील राजनंदिनी घुगे, सिद्धी मुंदडा आणि अकोल्यातील प्रभात किड्स स्कूलची विद्यार्थिनी सारंगा पटोकार, स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या श्रुती जैन, माधवी ढेपे, साक्षी घोडकी यांनी बाजी मारली आहे. मुलांमध्ये यज्ञेश मुंदडा, प्रथमेश कुलकर्णी व सागर जाधव गुणवत्ता यादीत चमकला आहे.अकोल्यातील प्रभात किड्स स्कूलमध्ये सीबीएसई उच्च माध्यमिक इयत्ता बारावीची पहिलीच बॅच असून, प्रभातच्या एकूण २३ विद्यार्थ्यांपैकी ११ विद्यार्थ्यांनी ए ग्रेड प्राप्त केला आहे तर फिजिकल एज्युकेशन या विषयात सर्वच विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त केले आहे. सारंगा हिने ९५ टक्के गुण प्राप्त केले आहेत. जीवशास्त्र विषयामध्ये तिने १०० पैकी ९९ गुण प्राप्त केले आहेत. शाळेचा एकूण निकाल ९५ टक्के लागला आहे. स्कूल आॅफ स्कॉलर्समधील श्रुती जैन हिने ९४.६ टक्के, यज्ञेश मुंदडा याने ९२.८0, माधवी ढेपे हिने ९१.६0, प्रथमेश कुलकर्णी याने ९१.४0, साक्षी घोडकी हिने ८९.४0 टक्के गुण प्राप्त केले. वाशिम जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय आणि भावना पब्लिक स्कूल या दोन्ही शाळांचा निकाल १00 टक्के लागला आहे. जवाहर नवोदय विद्यालय येथील एकूण ४६ विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा दिली होती. जवाहर नवोदय विद्यालयाची राजनंदिनी घुगे हिला ९५.0६ टक्के गुण मिळाले. सिद्धी मुंदडा हिला ९३.0३ टक्के मिळाले. सिद्धीने गणित विषयात १00 पैकी १00 गुण प्राप्त केले. सागर जाधव याला ९१ टक्के गुण मिळाले. एकंदरीत सीबीएसई निकालावरून मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून येत आहेत. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :AkolaअकोलाCBSE Examसीबीएसई परीक्षाStudentविद्यार्थी