शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

सुवर्ण पदकांत मुलींचीच बाजी!

By admin | Updated: February 6, 2017 02:40 IST

कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ;यावर्षी सुवर्ण पदकांत मुलींनी बाजी मारली.

अकोला, दि. ५- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३१ व्या दीक्षांत समारंभात रविवारी एकूण २,५९३ स्नातकांना निरनिराळ्या विषयात पदव्या प्रदान करण्यात आल्या आहेत. यामध्ये २६ सुवर्ण, १४ रौप्य व इतर रोख पुरस्काराचा समावेश आहे. यावर्षी सुवर्ण पदकांत मुलींनी बाजी मारली.पदवी प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये बी.एस्सी (कृषी) १७७४, उद्यान विद्या १२९, वन विद्या ३१, कृषी जैव तंत्रज्ञान ६६, कृषी व्यवसाय व्यवस्थापन ४५, अन्नशास्त्र ७७, बी.टेक (कृषी अभियांत्रिकी) ९३, पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्याशाखा मध्ये एम.एस्सी (कृषी) २६१, उद्यान विद्या ३६, वनविद्या १0, कृषी अभियांत्रिकी २२, एम.बी.ए. (कृषी) २१, पीएच.डी २८ आदींचा समावेश आहे. यावर्षीसुद्धा मुलींनी बाजी मारीत नागपूर कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आगा तबस्सुम मकबूल हिला एकूण सहा पदके मिळाली. यामध्ये ५ सुवर्ण व १ रौप्य पदकाचा समावेश आहे. मुलांमध्ये गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल आणि नक्षलप्रभावित क्षेत्रातील कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य भास्कर घोगरे यानेसुद्धा ३ सुवर्ण, १ रौप्य व २ रोख परितोषिकासह एकूण ६ पदके प्राप्त केली. या विद्यापीठातील सर्वच महाविद्यालयातील तो सर्वोत्तम असल्याचे त्याने सिद्ध केले, तर पदव्युत्तर शिक्षण संस्था अकोलाचा विद्यार्थी विकास रामटेके याने ३ सुवर्ण व २ रोख परितोषिकासह एकूण ५ पदके मिळविली. कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा मनजित पाठक यानेसुद्धा एकूण ५ पदके प्राप्त केली. यासह एकूण ३0 विद्यार्थ्यांनी एकूण ५९ पदके प्राप्त केली. चार उत्कृष्ट शिक्षक, ८ उत्कृष्ट संशोधक, २ उत्कृष्ट कर्मचारी व १ उत्कृष्ट संशोधन परितोषिक यांचा समावेश आहे, अशा प्रकारे एकूण ४५ विद्यार्थी व अधिकार्‍यांनी ७६ पदके प्राप्त केली. उत्कृष्ट शिक्षकामध्ये डॉ.एस.आर. पोटदुखे, डॉ.पी.पी. वानखडे, डॉ.एस.के. ठाकरे, डॉ. मेघा डहाळे, उत्कृष्ट संशोधक डॉ.ई.आर. वैद्य, डॉ.एस.एन. देशमुख, डॉ.एस.एस. निचळ, एस.बी. खरात, डॉ.पी.एन. माने, डॉ.पी.एच. बकाने, डॉ. प्रदीप बोरकर, डॉ. महेंद्र नागदेवे, अभियांत्रिकी शाखेतून डॉ. समीत कुमार नंदी तर उत्कृष्ट कर्मचारी म्हणून एस.जी. सूर्यवंशी, एस.आर. बोदडे यांचा समावेश आहे.पीएच.डी. प्राप्त केलेल्यांमध्ये श्यामकुमार मुंजे, सोनाली आवारे, जया तुमदाम, रविराज उदासी, अतुल गावंडे, विनोद नागदेवते, उज्ज्वला गावंडे, संजीव बंतेवाड, कविता चोपडे, प्राजक्ता मेटकरी, दीपाली बोरकर, मदन वांढरे, रवींद्र नैताम, संजीव नागे, अरविंद मकेसर, राजेंद्र वानखडे, शिवाजी यादलखेड, अभय वाघ, सिद्धेश्‍वर सावंत, अरविंदकुमार सोनकांबळे, प्रिया गावंडे, प्रमोद बकाने, मितल सुपे, सुशीलकुमार बनसुडे यांचा समावेश आहे.