शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

चहा कॅन्टीनवर काम करणारी ‘सपना’ झाली ‘नायिका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 15:39 IST

सपनाने वडिलांच्या चहा कॅन्टीनवर काम करीत, अभिनय, परिश्रमाच्या बळावर चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण केले आणि सपनाने यशस्वी अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार केले.

- संजय उमक लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : घरची परिस्थिती जेमतेम. वडील घरोघरी फिरून चहाची कॅन्टिन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. तीनही मुलींना त्यांनी शिक्षण देऊन मोठे केले. त्यापैकी एक सपना. सपनानेसुद्धा वडिलांच्या चहा कॅन्टीनवर काम करीत, अभिनय, परिश्रमाच्या बळावर चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण केले आणि सपनाने यशस्वी अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार केले.परिस्थिती कशीही असली तरी, जिद्द, परिश्रम आणि गुणवत्तेच्या जोरावर यश मिळविता येते. हेच सपना दीपक देवळकर हिने सिद्ध केले. सपनाने येथील जयनारायण बूब हिंदी हायस्कूल येथे प्राथमिक शिक्षण घेतले. बारावीचे शिक्षण घेत असतानाच, तिची पाऊले चित्रपटसृष्टीकडे वळली. अभिनयाच्या जोरावर तिने मराठी-हिंदी चित्रपटात छोट्या-मोठ्या भूमिका करून १६ मालिकांमध्ये सहायक अभिनेत्री म्हणून काम केले. सध्या एक महानायक डॉ. बी.आर. आंबेडकर या मालिकेमध्ये सपना महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ‘सपना’ कथ्थक नृत्यातही निपुण आहे. यासाठी तिला सरांनी सहकार्य केले. चित्रपटसृष्टीत जाण्याचे तिचे बालपणापासूनचे स्वप्न हाते. वडिलांची परिस्थिती बदलविण्यासाठी तिने चित्रपटसृष्टीचे स्वप्न पाहिले होते. प्रामाणिक आणि परिश्रमाने तिने चित्रपटसृष्टीत यश प्राप्त केले. लोक काय म्हणतील, याची तमा न बाळगता कामावर लक्ष केंद्रित केले. त्याचेच यश मिळाले. मूर्तिजापूरसारख्या छोट्या तालुक्यात राहणारी व घरची आर्थिक परिस्थितीदेखील जेमतेम असताना मुंबईत सिनेसृष्टीत आपले स्थान मिळविणे तिच्यासाठी निश्चितच सोपे नव्हते. तिने मोठ्या बहिणीसोबत दिल्ली गाठली. तेथे गेल्यावर ५ हजार रुपयांची नोकरी करीत, तिने नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये शिक्षण घेतले. मित्र, मैत्रिणींच्या सहकार्याने तिने तीन वर्ष नाटकात काम केले. दिल्लीत असतानाच, तिने ‘वेड’ मराठी चित्रपटासाठी आॅडिशन दिली. तिची निवडही झाली; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे चित्रपट प्रदर्शित झाला नाही. २०१६ मध्ये तिने मालिका व जाहिरात आॅडिशनसाठी थेट मुंबई गाठली. तिला टीव्ही मालिकेत एक छोटीशी भूमिका मिळाली. त्यानंतर तिने मात्र मागे कधी वळून बघितलेच नाही. पुढे तिला अभिनय क्षमतेच्या बळावर हिंदी, मराठी चित्रपट, मालिकांमध्ये भूमिका मिळत गेल्या. गत सहा वर्षांमध्ये सपनाने ‘ऐ जिंदगी, बीग मैजिक, इंडिया मोस्ट वॉन्टेड, कुमकुम भाग्य, परम अवतार श्रीकृष्ण, लाल ईश्क, दिवाने अंजाने यासारख्या १६ मालिका व हिंदी, मराठी चित्रपटात भूमिका साकारली आहे. ‘दिवाने अंजाने’मध्ये तिने मुख्य भूमिका साकारली. इच्छाशक्तीच्या जोरावर तिने कौटुंबिक परिस्थिती सावरून वडिलांचे स्वप्न साकार केले आहे.

यशाचे श्रेय प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र, अनुपम खेर यांना! चित्रपट, मालिकांमध्ये काम करीत असताना, प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र, अनुपम खेर यांची मोलाची मदत झाली. त्यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शनामुळे अभिनय खुलत गेला आणि यश मिळत गेले. आई-वडिलांनी, बहिणींना पाठबळ दिले. त्यामुळेच या क्षेत्रात यशस्वी होऊ. शकले, अशी प्रतिक्रिया सपना देवळकर हिने लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर