लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेली एक युवती फ ळ विक्रेत्याच्या मुलासोबत सरकारी बगीचा परिसरात संशयास्पद स्थितीत आढळल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांना पकडून रविवारी सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यता दिले. मूळची मूर्तिजापूरमधील रहिवासी असलेली या युवतीचे वडिलांचे छत्र हरविले असून, ती अमरावती येथील महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाला शिक्षण घेत आहे. या युवतीच्या घराशेजारीच रहिवासी असलेल्या युवकासोबत तिचे प्रेमसंबंध जुळलेले आहेत. हा मुलगा एका विशिष्ट जातीचा असून, त्याचे वडील फळ विक्रीचा व्यवसाय करतात. मुलगा कला शाखेत शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. हे दोघेही रविवारी अकोला शहरात एकत्र आल्यानंतर ते सरकारी बगीचा येथे बसलेले होते. दोघांच्याही हालचाली संशयास्पद असल्याने परिसरातील नागरिकांच्या ते लक्षात आले. या प्रेमीयुगलाची सरकारी बगीच्यातील नागरिकांनी विचारपूस केली असता, त्यांच्या माहितीमधून वाद निर्माण होणारी माहिती समोर आली. त्यामुळे नागरिकांनी आधी मुलाला व नंतर मुलीला चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर प्रेमीयुगलास सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांना मूर्तिजापूर येथून बोलावून घेतले. पोलिसांनी दोघांच्याही नातेवाईकांना समजावून सांगितले.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारी युवती प्रियकरासह ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:52 IST