शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणानंतर विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर; सर्वोपचारमध्ये उपचार सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 12:32 IST

अकोला : रुबेला, गोवर लसीकरण मोहिमेदरम्यान शुक्रवारी अकोट शहरातील एका शाळेत लसीकरणानंतर एक विद्यार्थिनी अचानक चक्कर येऊन खाली पडल्याने एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्दे अकोट येथील सेंट पॉल अ‍ॅकॅडमी शाळेत शुक्रवारी रुबेला, गोवर लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली.इयत्ता दहावीतील एक विद्यार्थिनी लसीकरणानंतर अचानक चक्कर येऊन खाली पडली.डॉक्टरांनी तिला तत्काळ सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात दाखल केले.

अकोला : रुबेला, गोवर लसीकरण मोहिमेदरम्यान शुक्रवारी अकोट शहरातील एका शाळेत लसीकरणानंतर एक विद्यार्थिनी अचानक चक्कर येऊन खाली पडल्याने एकच खळबळ उडाली. प्रकृती गंभीर असल्याने विद्यार्थिनीला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले. त्या विद्यार्थिनीची प्रकृती सुधारली असून, घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, अकोट येथील सेंट पॉल अ‍ॅकॅडमी शाळेत शुक्रवारी रुबेला, गोवर लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली. दरम्यान, इयत्ता दहावीतील एक विद्यार्थिनी लसीकरणानंतर अचानक चक्कर येऊन खाली पडली. घटनेमुळे शाळा परिसरात एकच खळबळ पसरली. विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर होत चालल्याने डॉक्टरांनी तिला तत्काळ सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात दाखल केले. त्यावेळी सर्वप्रथम तिचा सीटी स्कॅन काढण्यात आला. त्याचा अहवाल सामान्य आल्याने पालक व डॉक्टरांच्या जीवात जीव आला; परंतु रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप आला नाही. त्यामुळे लसीकरणामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थिनीच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.चक्कर आल्यास घाबरू नका...गोवर, रुबेला लसीकरणानंतर विद्यार्थ्यांना चक्कर येणे, खाज सुटणे, मळमळ होणे अशा किरकोळ समस्या येतात; परंतु त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही लस पूर्णत: सुरक्षित असून, त्याचा आरोग्याला कुठल्याच प्रकारचा धोका नसल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले.लसीकरणाला पर्याय नाही...बाळाला जन्मत: येणारं अंधत्व, बहिरेपणा तसेच डायरिया, निमोनिया यासारख्या आजारांना टाळायचं असेल, तर त्यावर रुबेला, गोवर लसीकरणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. 

लसीकरणानंतर विद्यार्थिनीला चक्कर आल्याने तिला तत्काळ सर्वोपचारमध्ये हलविण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असून, घाबरण्याचे कारण नाही. काही तपासणी अहवाल सामान्य आले आहेत. काही तपासण्यांचे अहवाल यायचे आहेत. २० दिवसांपूर्वी त्या विद्यार्थिनीला टायफॉइड असल्याचे तिच्या पालकांनी सांगितले होते, तसेच यापूर्वीदेखील तिची प्रकृती बिघडल्याचे पालकांनी सांगितले आहे.- डॉ. आरती कुलवाल, जिल्हा शल्यचिकित्सक.

 

टॅग्स :Akolaअकोलाakotअकोट