शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या ओढीने छत्तीसगडची अल्पवयीन प्रेयसी आली अकोल्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 14:38 IST

छत्तीसगड पोलिसांनी खदान पोलिसांच्या मदतीने प्रेयसीला बार्शीटाकळी येथून ताब्यात घेतले आणि तिला घेऊन छत्तीसगड पोलीस कुटुंबीयांसह राजनांदगाव येथे रवाना झाले.

ठळक मुद्देछत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथील एक अल्पवयीन मुलगी भिन्न धर्मीय युवकाच्या प्रेमात पडली.एक दिवस घरी कोणालाही न सांगता, थेट अकोला गाठले आणि खोकेवाली चाळमध्ये राहणाºया प्रियकराची भेट घेतली. ही माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाल्यावर त्यांनी, छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

अकोला : म्हणतात ना, प्रेम आंधळं असतं. प्रेमाला वय नसतं. प्रेमात आकंठ बुडालेल्या व्यक्तीला प्रेमाशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. असंच एका अल्पवयीन प्रेयसीबाबत घडलं. अकोल्यातील युवकाच्या प्रेमात पडलेल्या अल्पवयीन प्रेयसीला त्याच्या ओढीने चक्क अकोल्यात ओढत आणलं. अखेर छत्तीसगड पोलिसांनी खदान पोलिसांच्या मदतीने प्रेयसीला बार्शीटाकळी येथून ताब्यात घेतले आणि तिला घेऊन छत्तीसगड पोलीस कुटुंबीयांसह राजनांदगाव येथे रवाना झाले.छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथील एक अल्पवयीन मुलगी भिन्न धर्मीय युवकाच्या प्रेमात पडली. दोघांनी सोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेतल्या. दोघांचेही सतत मोबाइल फोनवर बोलणे व्हायचे. अल्पवयीन प्रेयसी प्रियकराच्या प्रेमात आकंठ बुडाली. प्रियकराचा विरह तिला सहन होत नव्हता. अशातच तिने एक दिवस घरी कोणालाही न सांगता, थेट अकोला गाठले आणि खोकेवाली चाळमध्ये राहणाºया प्रियकराची भेट घेतली. मुलगी अल्पवयीन असल्याने, प्रियकर व त्याच्या कुटुंबीयांनी मुलीला राजनांदगाव येथे परत पाठवून दिले. परंतु, काही महिन्यातच प्रेयसी पुन्हा अकोल्यात येऊन धडकली. ही माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाल्यावर त्यांनी, छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. छत्तीसगड पोलीस गुरुवारी सकाळी मुलीच्या कुटुंबीयांसह अकोल्यात हजर झाले. सुरुवातीला छत्तीसगड पोलिसांनी खदान पोलिसांच्या मदतीने खदान परिसरात मुलीचा शोध घेतला. परंतु, ती मिळून आली नाही. मुलगी ही प्रियकरासोबत बार्शीटाकळी येथे असल्याचे समजल्यावर खदान पोलिसांनी तिला तेथून ताब्यात घेतले आणि छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यात दिले. छत्तीसगड पोलीस तिला घेऊन कुटुंबासह राजनांदगावकडे रवाना झाले. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाKhadan Police Stationखदान पोलीस स्टेशन