शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

घरकुल लक्षांक : काही गावे तुपाशी तर काही उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 12:30 IST

अकोला : समाजकल्याण विभागाकडून प्राप्त घरकुलाचा लक्षांक गावनिहाय वाटप करताना काही पंचायत समित्यांमध्ये गटविकास अधिकाºयांनी मनमानी केल्याने काही गावांना तुपाशी तर काही गावांना उपाशी ठेवण्याचा प्रकार घडला आहे.

अकोला : समाजकल्याण विभागाकडून प्राप्त घरकुलाचा लक्षांक गावनिहाय वाटप करताना काही पंचायत समित्यांमध्ये गटविकास अधिकाºयांनी मनमानी केल्याने काही गावांना तुपाशी तर काही गावांना उपाशी ठेवण्याचा प्रकार घडला आहे. अकोला पंचायत समितीमध्ये प्रामुख्याने घडलेल्या या प्रकारात काही गावांवरचे प्रेम अक्षरक्ष: उतू गेल्याचे दिसून येत आहे. तर त्याचवेळी इतर गावांना एकच घरकुल देण्याचा करंटेपणाही घडला आहे. त्यासाठी लाभार्थींकडून काही गावातील सरपंच, सचिवांसह दलालांनी लाखो रुपये वसूल केले आहेत.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला सामाजिक न्याय विभागाकडून घरकुलांचा पंचायत समितीनिहाय लक्षांक ठरवून दिला. ग्रामीण विकास यंत्रणेने गावनिहाय लक्षांक वाटपाची जबाबदारी संबंधित गटविकास अधिकाºयांकडे सोपवली. त्याचाच लाभ उठवण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील काही पंचायत समित्यांमध्ये झाला आहे. काही गावातील सरपंच, सचिवांना हाताशी धरून किती घरकुलांसाठी लाभार्थींकडून रक्कम मिळू शकते, याचा अंदाज घेण्यात आला. त्यानुसार गावनिहाय घरकुलांची संख्या देण्याचे नियोजन पंचायत समिती स्तरावर झाले. काही गावांतील दलालांनी त्यासाठी वसुली केली. ग्रामपंचायतींना घरकुलाचा लक्षांक देताना मिळालेल्या हिशेबानुसार संख्या ठरवण्यात आली. त्यासाठी घरकुल लक्षांक वाटपाचे निकष, दिशानिर्देश बाजूला ठेवण्यात आले. प्रामुख्याने हा प्रकार अकोला पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणात घडला. इतर पंचायत समित्यांमध्ये चौकशी केल्यास ते पुढे येणार आहे.- घरकुलांची खिरापतप्राप्त गावेअकोला पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी जी.आर. बोंडे यांनी अत्यंत घाईत केलेल्या गावनिहाय घरकुल वाटपात विविध गावांना खिरापतीसारखे वाटप झाले. त्यामध्ये बोरगावमंजू ग्रामपंचायतीला ५६, त्यानंतर उगवा येथे ३८ घरकुले देण्यात आली. पळसो बुद्रूक -३५, पातूर नंदापूर-२८, मजलापूर-२८, घुसर-२१, डोंगरगाव-२०, चिखलगाव-२०, कुरणखेड-१८, कुंभारी-१८, भौरद-१८, मोरगाव (भाकरे)-१७, कोठारी-१७, म्हैसांग-१७, लाखनवाडा-१७, सांगळूद-१६, नवथळ-१५, मासा-१५, दहीगाव गावंडे-१४, रामगाव-१२.- अल्प लक्षांकांमुळे वंचित गावेखिरापत मिळालेल्या काही गावांच्या लोकसंख्येएवढीच असलेल्या गावांमध्ये अत्यल्प घरकुले देण्यात आली. त्यामध्ये आपातापा-३, गोरेगाव बुद्रूक-३, कापशी तलाव-३, येवता-३, लोणाग्रा-३, निराट-१, वैराट-२, बादलापूर-२, दुधाळा-२, दोडकी-३, निंबी-२, पाळोदी-४, सुकोडा-३, टाकळी जलम-१ याप्रमाणे घरकुले देण्यात आली. केवळ वसुलीसाठी विषम संख्येने घरकुल वाटप केल्याने हा प्रकार नव्याने रूजू झालेले गटविकास अधिकारी राहुल शेळके यांनी थांबवला. गावनिहाय घरकुलांच्या लक्षांकांचे फेरवाटप करण्याचे नियोजन करत तसा आदेश त्यांनी तयार केला आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना