शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

वाळू नसलेल्या नाल्यांवर घरकुल लाभार्थ्यांची बोळवण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:51 PM

अकोला : घरकुल बांधकामांसाठी अकोला तालुक्यातील ३० ग्रामपंचायती अंतर्गत लाभार्थ्यांना स्वखर्चाने वाळूची उचल करण्याकरिता घुसर, घुसरवाडी व म्हातोडी या तीन गावांच्या नाल्यातील वाळूस्थळे अकोला तहसील कार्यालयामार्फत निश्चित करण्यात आली.

- संतोष येलकर

अकोला : घरकुल बांधकामांसाठी अकोला तालुक्यातील ३० ग्रामपंचायती अंतर्गत लाभार्थ्यांना स्वखर्चाने वाळूची उचल करण्याकरिता घुसर, घुसरवाडी व म्हातोडी या तीन गावांच्या नाल्यातील वाळूस्थळे अकोला तहसील कार्यालयामार्फत निश्चित करण्यात आली; परंतु या नाल्यांमध्ये वाळू उपलब्ध नसल्याने, वाळूची उचल करण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांना वाळूविना परतावे लागल्याचा प्रकार ११ मार्च रोजी घडला. त्यामुळे वाळू नसलेल्या नाल्यांची स्थळे देऊन घरकुल लाभार्थ्यांची बोळवण करण्यात आल्याचे वास्तव समोर आले आहे.प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना व इतर योजनांतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना घरकुल बांधकामांसाठी प्रत्येकी पाच ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचा आदेश शासनामार्फत देण्यात आला आहे. त्यानुषंगाने अकोला तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांची यादी अकोला पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आली. त्यानुसार घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल बांधकामांसाठी मोफत पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यासाठी तहसील कार्यालयामार्फत तालुक्यातील वाळूची स्थळे निश्चित करण्यात आली. निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणाहून ११ मार्च रोजी घरकुल लाभार्थ्यांनी स्वखर्चाने वाळूची उचल करण्याचा आदेश अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी दिला. त्यानुसार घुसर, घुसरवाडी व म्हातोडी येथील नाल्यातील वाळूची उचल करण्यासाठी परिसरातील ३० ग्रामपंचायती अंतर्गत घरकुल लाभार्थी ट्रकसह आले होते; परंतु या तीन नाल्यांमध्ये वाळू उपलब्ध नसल्याचे आढळून आले. वाळूची उचल करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या नाल्यातील वाळू स्थळांवर वाळू उपलब्ध नसल्याने, आलेल्या घरकुल लाभार्थ्यांना वाळूविनाच घरी परतावे लागले. त्यामुळे वाळू उपलब्ध नसलेली नाल्यांची ठिकाणे निश्चित करून घरकुल लाभार्थ्यांची बोळवण करण्यात आल्याचे वास्तव समोर आले.३० ग्रा.पं.च्या लाभार्थींसाठी नाल्याची वाळू स्थळे निश्चित!वाळू स्थळ ग्रामपंचायतनिहाय लाभार्थीघुसर नाला घुसर, आपोती बु., सांगळूद, यावलखेड, कौलखेड गोमासे, रामगाव, दहीगाव, वरोडी व आपातापा.घुसरवाडी नाला अंबिकापूर, दापुरा, म्हैसांग, लाखोंडा, आखतवाडा, मजलापूर, अनकवाडी व धोतर्डी.म्हातोडी नाला म्हातोडी, कासली बु., निंभोरा, एकलारा, दोनवाडा, कपिलेश्वर, वडद बु., दहीगाव, हिंगणी बु., काटी-पाटी, रोहणा, कट्यार व मारोडी.घुसर, घुसरवाडी, म्हातोडी येथील नाल्याची ठिकाणे वाळू घाट नाहीत. नाल्यांमध्ये वाळू उपलब्ध नसताना घरकुल लाभार्थींना वाळू देण्यासाठी नाल्याची ठिकाणे तहसीलदारांकडून निश्चित कशी करण्यात आली, असा प्रश्न निर्माण होत असून, संबंधित तीन नाल्यांमध्ये वाळू नसल्याने, वाळूसाठी ट्रॅक्टरसह गेलेल्या घरकुल लाभार्थींना वाळूविना घरी परतावे लागले. त्यामुळे नाहक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.-दिलीप मोहोड,सरपंच, आखतवाडा तथाअध्यक्ष, बारुला कृती समिती, आपातापा.गटविकास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या घरकुल लाभार्थींना वाळू उपलब्ध करून देण्यासाठी महसूल मंडळ अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार वाळूची स्थळे निश्चित करण्यात आली. घुसर, घुसरवाडी व म्हातोडी येथील नाल्यांमध्ये माती मिश्रित वाळू उपलब्ध होती. नाल्याच्या ठिकाणी वाळू उपलब्ध झाली नसल्याने, घरकुल लाभार्थींनी ग्रामपंचायतमार्फत वाळूची मागणी केल्यास संबंधित लाभार्थींना वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे.- विजय लोखंडे,तहसीलदार, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोला