शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे, हवाई प्रवासासह मॉल प्रवेशासाठी घरबसल्या मिळवा युनिव्हर्सल ई-पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:22 IST

अकोला : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने निर्बंध जवळपास हटले आहेत. मात्र, राज्य शासनाने हवाई प्रवास, रेल्वेद्वारे आंतरराज्य प्रवासासह ...

अकोला : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने निर्बंध जवळपास हटले आहेत. मात्र, राज्य शासनाने हवाई प्रवास, रेल्वेद्वारे आंतरराज्य प्रवासासह मॉलमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आता घरबसल्या ‘सिस्टीम जनरेट पास’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हे युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पास कोणत्याही अधिकाऱ्याकडे न जाता स्वत:च ऑनलाइन माहिती भरून मोबाईलवर डाऊनलोड करता येणार आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर हे पास मिळणार आहेत. कोरोनाकाळात प्रवास करायचा असल्यास महसूल व पोलीस प्रशासनाकडून ई-पास दिले जात होते. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने या पासची आवश्यकता भासत नाही. मात्र, हवाई प्रवासासाठी तसेच रेल्वे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे आंतरराज्य प्रवास करायचा झाल्यास कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे.

मोबाईलवरूनच मिळविता येणार पास

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी राज्य सरकारच्यावतीने युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, आपल्या मोबाईलवरूनच हा पास मिळविता येणार आहे. हा पास मोबाईलमध्येच डाऊनलोड करून ठेवल्याने कोणत्याही प्रवासामध्ये तसेच मॉलमधील प्रवेशासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. लोकल प्रवासाच्या पाससाठी हा पास लागणार असून, आपल्याकडे लोकल नसल्या तरी इतर हवाई, रेल्वे प्रवासासाठी त्याचा उपयोग होऊ शकणार आहे.

असा मिळवा ई-पास

- पात्र नागरिकांनी https://epassmsdma.mahait.org ही वेब लिंक उघडावी.

- त्यातील ‘ट्रॅव्हल पास फॉर व्हॅक्सिनेटेड सिटिझन्स’ यावर क्लिक करा.

- त्यानंतर आपला कोविड लसीकरणासाठी नोंदविलेलाच मोबाईल क्रमांक नमूद करावा. लगेचच मोबाईलवर ओटीपी अर्थात एकवेळ वापरासाठीचा पासवर्ड लघुसंदेश (एसएमएस) द्वारे प्राप्त होईल.

- हा ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाईल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक इत्यादी तपशील आपोआप समोर दिसतील.

- त्यामध्ये ‘पास निर्माण करा’ (जनरेट पास) या पर्यायावर क्लिक करावे.

- त्यावर क्लिक करताच अर्जदाराचा तपशील तसेच कोविड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याची दिनांक इत्यादी सर्व तपशील आपोआप दिसेल.

- या तपशीलमध्ये ‘सेल्फ इमेज’ या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे. ते मोबाईल गॅलरीतून अपलोड करता येऊ शकते किंवा मोबाईल कॅमेराद्वारे जागीच छायाचित्र (सेल्फी) काढूनदेखील अपलोड करता येईल.

- ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील २४ तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासकरिता लघुसंदेश (एसएमएस)द्वारे लिंक प्राप्त होईल.

- लिंक प्राप्त झाल्यानंतर ई-पास मोबाईलमध्ये जतन (सेव्ह) करून ठेवावा.

दोन्ही डोस घेतले किती? (टक्क्यांत)

घटक पहिला डोस दुसरा डोस

फ्रंटलाइन वर्कर्स - ९९.६६ - ७३.३१

आरोग्य कर्मचारी - ९२.८५ - ६६.७७

१८ ते ४४ वयोगट - १६.९१ - ३.२१

४५ ते ५९ वयोगट - ३३.१८ - १७.४५

६० वर्षांवरील - ५०.९६ - २४.८७