शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘जीओ’कडून विनापरवाना खोदकाम; ठेकेदाराविरूद्ध पोलिसांत तक्रार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 15:49 IST

वाशिम : दुरसंचार क्षेत्रात कार्यरत ‘जीओ’ कंपनीकडून रिसोड-हिंगोली राष्ट्रीय महामार्गालगतच्या रस्त्यांवर भूमिगत आॅप्टीकल केबल टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, यासाठी संबंधित विभागाची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दुरसंचार क्षेत्रात कार्यरत ‘जीओ’ कंपनीकडून रिसोड-हिंगोली राष्ट्रीय महामार्गालगतच्या रस्त्यांवर भूमिगत आॅप्टीकल केबल टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, यासाठी संबंधित विभागाची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही. त्यानुषंगाने ‘लोकमत’ने ८ आॅक्टोबरच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित करताच खडबडून जागे झालेल्या यंत्रणेने तत्काळ खोदकाम सुरू असलेले स्थळ गाठून विनापरवाना खोदकाम करणारा ठेकेदार पंडित सोनवणे याच्याविरूद्ध शिरपूर पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, खोदकामस्थळी मशीन बेवारस सोडून मजूरवर्गही पसार झाल्याचे दिसून आले.ग्रामीण भागात पुरेशा गतीने नेट कनेक्टिव्हिटी पोहचविण्यासाठी ‘जीओ’ कंपनीकडून भूमिगत आॅप्टिकल केबल टाकले जात आहेत. हे काम करित असताना शेतकºयांच्या शेतातील उभी पिके तद्वतच मोठमोठी झाडेही जमिनदोस्त होत आहेत. दरम्यान, मालेगाव-शिरपूर रस्त्यावर सुरू असलेला हा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणून यासंबंधी सखोल चौकशी केली असता, संबंधित ठेकेदाराने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या या रस्त्यावर खोदकामासाठी कुठलीही परवानगी घेतली नसल्याची बाब निष्पन्न झाली. त्यानुषंगाने ८ आॅक्टोबरच्या अंकात यासंंबंधी सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्याची दखल घेवून राष्ट्रीय महामार्ग वाशिम उपविभागाचे कनिष्ठ अभियंता साईप्रसाद दिनेशराव मुनगिलवार यांनी शिरपूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार, सदर कामाची ठेकेदार पंडित सोनवणे याने कुठलीही परवानगी न घेता खोदकाम केल्याने याप्रकरणाची सखोल चौकशी केली जावी, असे तक्रारीत नमूद आहे.

टॅग्स :washimवाशिम