शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

अकोल्यात जातिवंत बोकडांचा स्वतंत्र बाजार!

By admin | Updated: September 3, 2016 02:20 IST

दलालांना फाटा; पशू विज्ञान संस्थेचा शासकीय स्तरावरील राज्यातील पहिला प्रयोग.

अकोला, दि. २ : शेतकर्‍यांना योग्य दर मिळावेत, याकरिता दलालांना फाटा देत अकोल्यात प्रथमच जातिवंत, निरोगी बोकडांचा स्वतंत्र बाजार भरविण्यात येत असून, आतापर्यंत २00 शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील शेळी, बोकडांची नोंद केली आहे. कोणतीही शासकीय मदत न घेता स्नातकोत्तर पशुवैद्यकीय, पशू विज्ञान संस्था व जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्यावतीने ३ ते १0 सप्टेंबरपर्यंत बोकड प्रदर्शन व विक्री बाजार भरविण्यात येत आहे. राज्यातील हा पहिलाच उपक्रम मानल्या जात आहे.शेतीला पूरक पशूपालन, दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. बोकड, शेळी, कुक्कुट पालन हे कमी खर्चाचे अधिक उत्पादन देतात. यासाठीचे प्रशिक्षण या संस्थेमार्फत देण्यात येत आहे. भविष्यातील बोकड, शेळी उत्पादन व्यवसायाचे महत्त्व आहे. त्या दृष्टीने पशुविज्ञान संस्थेने शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. अकोल्यात प्रथमच निरोगी व जातिवंत बोकड प्रदर्शन भरविण्याचा निर्णय स्नातकोत्तर पशुवैद्यकीय व पशू विज्ञान संस्था व पशुसंवर्धन विभागाने घेतला असून, संस्थेच्या आवारात ३ सप्टेंबरपासून १0 दिवस हे प्रदर्शन राहणार आहे. बोकडांची दलालामार्फत विक्री होत असल्याने उत्पादकांना योग्य दाम मिळत नाहीत. ग्राहकांना जातिवंत व निरोगी बोकड मिळावेत व शेतकरी उत्पादकांनाही योग्य दर मिळावेत, हा या प्रदर्शनामागील उद्देश आहे.सध्या बोकडाचे दर वाढले असून, पुणे जिल्हय़ातील लोणंद येथील एका शेतकर्‍यांकडील बोकडाची किंमत ६0 हजार रुपये आहे, तर औरंगाबाद जिल्हय़ात हीच किंमत लाखावर पोहोचली आहे. बोकड निर्यातीला चांगला वाव असून, नुकतेच नाशिक येथील विमानतळावरू न १६00 बोकडांची आखाती देशात निर्यात करण्यात आली आहे. पूर्वी कांडला बंदरातून जहाजाने बोकड विदेशात पाठवले जात होते. बर्‍याच बोकडांचा जलमार्गाच्या सहा ते सात दिवसाच्या प्रवासात मृत्यू होत होता. आता चार ते पाच तासांत जवळच्या देशात निर्यात करण्यात येत आहे.कमी खर्चाच्या या व्यवसायाकडे शेतकरी वळला, तर निश्‍चितच शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबण्यास मदत होईल, या अनुषंगाने शेळी, मेंढी, कुक्कुट पालन प्रशिक्षण शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. एवढेच नव्हेतर त्यांच्याकडील पशूंना योग्य दर मिळावेत म्हणून विक्री व प्रदर्शन भरवण्यात आले आहे.- डॉ.हेमंत बिराडे,अधिष्ठाता,स्नातकोत्तर पशुवैद्यकीय व पशुविज्ञान संस्था, अकोला.