शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

सर्वसाधारण सभा स्थगित; सत्ताधा-यांची नाचक्की

By admin | Updated: May 28, 2015 18:57 IST

विरोधकांचा हल्लाबोल; मनपा बरखास्त करण्याची मागणी.

अकोला: शहर विकासाच्या महत्त्वपूर्ण विषयांवर आयोजित करण्यात आलेली महापालिकेची सर्वसाधारण सभा नगरसेवकांच्या अनुपस्थितीचे कारण देत स्थगित करण्याची वेळ महापौर उज्ज्वला देशमुख यांच्यावर आली. महापालिकेत चक्क तिसर्‍यांदा सभा स्थगित करण्याची नामुष्की सत्ताधारी पक्षावर ओढवली असून, विरोधकांनी जोरदार हल्लाबोल करीत मनपा बरखास्त करण्याची मागणी लावून धरली आहे. मालमत्तांच्या पुनमूुल्यांकनासाठी जीआयएस प्रणाली, शहर बस सेवा, सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या निविदेला मंजुरी देण्यासह महान ते मोर्णा प्रकल्पापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यासाठी महापौर उज्ज्वला देशमुख यांनी २७ मे रोजी मनपाच्या मुख्य सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन केले. सभा सुरू होण्यापूर्वीच भाजप नगरसेवक सुरेश अंधारे यांनी महिला नगरसेवकांना सभागृहातून बाहेर जाण्याची सूचना केली. सभागृहात शिवसेना, भाजप, काँग्रेस, भारिप-बमसंचे अवघे १४ नगरसेवक उपस्थित असताना महापौरांनी सभा सुरू करण्याचे निर्देश नगर सचिव अनिल बिडवे यांना दिले. बिडवे यांनी सभेला सुरुवात करताच, ज्येष्ठ नगरसेवक सुनील मेश्राम यांनी नगरसेवकांची पुरेशी संख्या नसल्याने सभेचे कामकाज घेता येत नसल्याचे स्पष्ट केले. ही चूक लक्षात येताच, महापौरांनी अवघ्या दहा मिनिटात सभा स्थगित केल्याचे जाहीर केले. भाजपतील अंतर्गत कलह शहर विकासाच्या मुळावर उठल्याची टीका काँग्रेसचे शहर अध्यक्ष मदन भरगड, भारिपचे गजानन गवई यांनी केली.