शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई,अधिकाऱ्यांच्या अरेरावीवर गाजली सभा

By admin | Updated: April 4, 2017 01:43 IST

महापौरांची अजय शर्मा, राजेश मिश्रा सोबत चकमक

अकोला: शहरातील जुन्या प्रभागांसह नवीन मलकापूर, शिवनी, शिवर तसेच डाबकी प्रभागात पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. हातपंप नादुरुस्त आहेत. अशा स्थितीत नागरिकांची पाणीपट्टी तपासताना जलप्रदाय विभागाचे अधिकारी उर्मट भाषा वापरतात. त्यांना आवर घालण्याच्या मागणीवर सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले. हा प्रकार कमी म्हणून की काय, महापौर विजय अग्रवाल यांची भाजप नगरसेवक अजय शर्मा, सेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचे सभागृहात पाहावयास मिळाले. मनपा क्षेत्रात नव्याने सामील झालेल्या मलकापूर, डाबकी, शिवनी आदी भागात पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. महान धरणावरून खडकी भागाला पाणीपुरवठ्याची सोय होऊ शकते. अशावेळी मलकापूर भागाला का नाही, असा सवाल उपस्थित करून प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी असा भेदभाव करणे योग्य नसल्याचा मुद्दा शिवसेना नगरसेवक मंगेश काळे यांनी उपस्थित केला. तत्पूर्वी साफसफाई, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था आदी विषयांवर भाजप गटनेता राहुल देशमुख, सुमनताई गावंडे, योगीता पावसाळे, उषा विरक, सुनीता अग्रवाल, सतीश ढगे, मंजूषा शेळके, अनिल गरड, सुनील क्षीरसागर, गजानन चव्हाण, विनोद मापारी, अनिता दुबे, सोनी आहुजा, आम्रपाली उपर्वट, काँग्रेसचे गटनेता साजिद खान, नगरसेवक अ‍ॅड. एक्बाल सिद्दिकी, रहीम पेंटर, पराग कांबळे, शाहीन अंजूम महेबुब खान, चांदनी शिंदे, मोहम्मद इरफान तसेच मोहम्मद मुस्तफा यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. सभेला सुरुवात होताच भाजप, सेना, काँग्रेसचे नगरसेवक साफसफाईच्या मुद्यावर पोटतिडकीने बोलू लागले. सर्व नगरसेवक एकाच वेळी बोलत असल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला. त्यावेळी विषयाला सोडून बोलू नका, असे भाजप नगरसेवक अजय शर्मा यांनी इतर नगरसेवकांना उद्देशून म्हणताच महापौर विजय अग्रवाल यांचा अचानक पारा चढला. मला सल्ला देऊ नको, मी येथे आहे असे म्हणताच या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. अखेर गटनेता राहुल देशमुख यांनी मध्यस्थी करीत प्रकरण शांत केले.महापौर, सेनेचे गटनेता आमनेसामनेशिवसेना नगरसेवक मंगेश काळे यांनी उपस्थित केलेल्या मलकापूर येथील पाणीटंचाईच्या मुद्याकडे महापौर,आयुक्तांचे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येताच गटनेता राजेश मिश्रा यांनी बाजू सांभाळली. सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवक प्रश्न उपस्थित करीत असताना त्यावर उत्तर देण्यासाठी एकही अधिकारी बोलत नसल्याचे सांगत गटनेता राजेश मिश्रा यांनी महापौर साहेब, हा पोरखेळ थांबला पाहिजे. नगरसेवकांच्या समस्यांचे निराकरण झाले पाहिजे, असे म्हणताच महापौर विजय अग्रवाल यांनी येथे मजाक सुरू नाही. मी महापौर या नात्याने उत्तर देतोय ना, मग होतील कामे, असे राजेश मिश्रा यांना सुनावले. सेना नगरसेवकांची मुस्कटदाबीसभागृहात शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाकडे महापौरांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले. हाच अनुभव काँग्रेसच्या नगरसेवकांना आला. काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी याबाबतीत खासगीत नाराजी व्यक्त केली. शिवसेना नगरसेवकांची मुस्कटदाबी केल्याची चर्चा मनपा वर्तुळात रंगली होती. महापौर अधिकाऱ्यांच्या भूमिकेत?मूलभूत सुविधांची दाणादाण उडाली असून क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, सफाई कर्मचारी, पथदिवे दुरुस्त करणारे कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याच्या विषयावर नगरसेवकांनी असंख्य प्रश्न उपस्थित केले. नगरसेवकांच्या प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तरे देणे अपेक्षित असताना प्रत्येक प्रश्नाला महापौर विजय अग्रवाल सामोरे गेले हे येथे उल्लेखनीय.