शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात कचऱ्याचे ढिगारे;  मनपाची आरोग्य यंत्रणा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 14:56 IST

अकोला : शहरात स्वच्छता राखण्यासाठी महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपाने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली असताना, शहराच्या कानाकोपऱ्यात घाणीचे व कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत’ अभियानचा मोठ्या प्रमाणात गवगवा केला जात असतानाच शहराच्या कानाकोपऱ्यात घाण व कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.सत्ताधारी भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांना शहरातील अस्वच्छता दिसत नाही का, असा सवाल अकोलेकरांनी उपस्थित केला आहे.

अकोला : शहरात स्वच्छता राखण्यासाठी महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपाने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली असताना, शहराच्या कानाकोपऱ्यात घाणीचे व कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मनपाची स्वच्छता व आरोग्य यंत्रणा कोलमडल्यामुळे आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांसह खासगी कंत्राटदारांना कोणाचाही धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ भारत अभियानचा गवगवा करणाºया सत्ताधारी भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांना अकोला शहरातील अस्वच्छता दिसत नाही का, असा सवाल अकोलेकरांनी उपस्थित केला आहे.केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानच्या धर्तीवर राज्य शासनाने ‘स्वच्छ महाराष्ट्र’अभियान राबवण्यास सुरुवात केली. कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर प्रभावी तोडगा काढण्याच्या उद्देशातून केंद्रासह राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापनाच्या विषयावर कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. नागरिकांची दुकाने, प्रतिष्ठाने तसेच घरातून निघणाऱ्या कचऱ्याचे ओला व सुका या पद्धतीने विलगीकरण करणे शासनाने बंधनकारक केले आहे. अशा कचºयाचे विलगीकरण केल्यावरच त्याची डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावण्याचे शासनाचे निर्देश आहेत. शिवाय डम्पिंग ग्राउंडवर टाकलेल्या कचºयावरही प्रक्रिया करण्यासाठी स्वायत्त संस्थांनी ठोस निर्णय घेणे शासनाला अपेक्षित आहे. त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला. प्राप्त निधीतून कचºयाची समस्या निकाली काढण्याची गरज असताना सत्ताधारी भाजपासह प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यासह देशभरात ‘स्वच्छ भारत’ अभियानचा मोठ्या प्रमाणात गवगवा केला जात असतानाच शहराच्या कानाकोपऱ्यात घाण व कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.अकोलेकरांना जबाबदारीचा विसरशहराच्या कोण्याही भागात फेरफटका मारल्यास सर्व्हिस लाइन घाणीने गच्च भरल्याचे दिसून येते. गल्लीबोळात कचºयाचे ढीग साचल्यामुळे नागरिकही त्यांच्या घरातील केरकचरा घंटागाडीत कितपत टाकतात, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. घरातील कचरा घंटागाडीत टाकल्यास उघड्यावर कचरा साचणार नाही, याची जाण अकोलेकरांनी ठेवण्याची गरज आहे.

 आरोग्य निरीक्षक सुस्त, अकोलेकर त्रस्त!शहरात दैनंदिन होणाºया साफसफाईच्या कामावर देखरेख ठेवून त्यांची तपासणी करण्याची जबाबदारी मनपाच्या स्वच्छता व आरोग्य विभागाच्या अखत्यारित सेवा बजावणाºया आरोग्य निरीक्षकांवर आहे. त्यांच्यावर मानधन तत्त्वावर कार्यरत सहाय्यक आरोग्य निरीक्षक अब्दुल मतीन यांचे नियंत्रण आहे. शहरातील मुख्य रस्ते, मुख्य बाजारपेठेत साचलेली घाण सर्वसामान्य अकोलेकरांना दिसत असताना मनपाचे आरोग्य निरीक्षक दिवसभर करतात तरी काय, असा प्रश्न निर्माण होतो. ज्या भागात घाण व कचरा साचला असेल, त्या प्रभागातील आरोग्य निरीक्षकांच्या वेतनातून दंड वसूल करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका