शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या प्रयत्नात असलेली टोळी गजाआड;  देशीकट्टा, जीवंत काडतूस, चाकू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 16:20 IST

अकोला: दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार जणांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीदरम्यान फतेह चौकाजवळून अटक केली.

ठळक मुद्देचांदेकर चौक ते फतेह चौकादरम्यान एमएच ३0 एए ६९६४ क्रमांकाच्या आॅटोरिक्षामध्ये बसून चौघे जण संशयास्पद स्थितीत फिरत असल्याचे पथकाला दिसून आला. पथकातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील तिघे जण सराईत गुन्हेगार आहेत. आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याकडून आॅटोरिक्षासह देशी कट्टा, जीवंत काडतूस, चाकू व लोखंडी पहार जप्त केली.

अकोला: दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार जणांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीदरम्यान फतेह चौकाजवळून अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी एक देशीकट्टा, एक जीवंत काडतूस आणि एक चाकू जप्त केला. अशी माहिती शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, ठाणेदार अनिल जुमळे यांनी मंगळवारी दुपारी पत्रपरिषदेत दिली.कोतवाली पोलिसांचे पथक रात्री गस्त घालीत असताना, चांदेकर चौक ते फतेह चौकादरम्यान एमएच ३0 एए ६९६४ क्रमांकाच्या आॅटोरिक्षामध्ये बसून चौघे जण संशयास्पद स्थितीत फिरत असल्याचे पथकाला दिसून आला. पथकातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील तिघे जण सराईत गुन्हेगार आहेत. त्यांची कसून चौकशी केल्यावर आरोपींनी दरोडा घालण्याच्या उद्देशाने जात असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी चौघांची झडती घेतली. दरम्यान आरोपी राजु मधुकर हिवराळे(रा. अनंत नगर जुने शहर) याच्याकडून एक देशीकट्टा व एक जीवंत काडतूस(किंमत ५ हजार रूपये) आढळून आले. आरोपी अनिल उत्तम रताळ(रा. आंबेडकर नगर) याच्याकडून धारदार चाकू व लोखंडी पहार आढळून आली. त्यांच्यासोबत अमोल डिगांबर पवार(रा. संजय नगर लहान उमरी हा होता. आॅटोरिक्षा चालक पंकज धनंजय दिघेकर(रा. अकोट फैल) हा त्यांना घेवून जात होता. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याकडून आॅटोरिक्षासह देशी कट्टा, जीवंत काडतूस, चाकू व लोखंडी पहार जप्त केली. आरोपींविरूद्ध भादंवि कलम ३९८, सहकलम ३/२५ आर्म अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पथकातील एएसआय जगदिश जायभाये, अनिल धनभर, प्रमोद डुकरे, विपुल सोळंके, ज्ञानेश्वर रडके, यशोधन जंजाळ, नागसेन वानखडे, अमित बोळे यांनी केली.काडतूस टाकले पोलिसांच्या गाडीतपोलिसांनी आरोपींचा आॅटोरिक्षा पकडल्यानंतर, झडती घेतली. झडतीदरम्यान आरोपींकडे देशीकट्टा आढळून आला. काडतूस कुठे आहे. असे विचारल्यावर आरोपींनी माहिती दिली नाही. आरोपी राजु हिवराळे याने पोलिसांना काडतूस दिसू नये. यासाठी जीवंत काडतूस पोलिसांच्याच गाडीत टाकून दिले. परंतु पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने पोलिसांच्या गाडीत फेकून दिलेले काडतूस दाखविले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCity kotwali Police Stationसिटी कोतवाली पोलीस स्टेशन