शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकली चोरणारी अल्पवयीन मुलांची टोळी गजाआड

By admin | Updated: November 8, 2014 00:18 IST

अकोल्यातील रामदासपेठ पोलिसांची कारवाई, मुलांकडून तीन मोटारसायकली जप्त.

अकोला : मोटारसायकली चोरणार्‍या अल्पवयीन मुलांच्या टोळीस रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन मोटारसायकली जप्त केल्या. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने एकाची कारागृहात तर चार जणांची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे. रामदासपेठ पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या रेल्वे स्टेशन व न्यायालय परिसरातून मोटारसायकली चोरी जाण्याच्या घटना काही दिवसांपासून वाढल्या आहेत. याप्रकरणी रामदासपेठ पोलिस ठाण्यामध्ये मोटारसायकली लंपास झाल्याच्या तक्रारीसुद्धा दाखल करण्यात आल्या. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांना काही अल्पवयीन मुलेच मोटारसायकली चोरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या माहितीच्या आधारे शोध मोहीम सुरू केली. गुरुवारी पोलिसांनी दीपेश अशोक मोदी (२१) याच्यासह ९ वर्षीय चिमुकल्या मुलासह १२, १३ व १६ वर्षीय मुलांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून एमएच ३0 एसी ५५६५ क्रमांकाची टीव्हीएस, एमएच ३0 के ८९१३ क्रमांकाची हीरो होंडा आणि एमएच ३0 एफ २९0८ क्रमांकाची स्कुटी जप्त केली. पोलिसांनी बाल गुन्हेगारांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दीपेश मोदी याची कारागृहात तर इतर चौघांची बाल सुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. ही कारवाई एपीआय वैशाली आढाव, रवी इरचे, जय मंडावरे, प्रवीण भोळे यांनी केली.