शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गावकर्‍यांच्या मदतीने अट्टल दरोडेखोरांची टोळी गजाआड

By admin | Updated: July 14, 2014 00:49 IST

अट्टल दरोडेखोरांच्या टोळीला माना पोलिसांनी बपोरी व सोनोरी गावकर्‍यांच्या मदतीने गजाआड केले.

अकोला/कुरूम : ह्यबायकर गँगह्णची दहशत जिल्हाभर पसरली असतानाच माना पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या सोनोरी शिवारात शनिवारी रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असणार्‍या अट्टल दरोडेखोरांच्या टोळीला माना पोलिसांनी बपोरी व सोनोरी गावकर्‍यांच्या मदतीने गजाआड केले. या टोळीत ६ जणांचा समावेश आहे. मूर्तिजापूर न्यायालयाने आरोपींना १९ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. शनिवारी रात्री माना पोलिस स्टेशनचे पथक बपोरी भागात गस्त घालीत असताना, ठाणेदार एपीआय सुनील हुड यांना सोनोरी शिवारामध्ये मोटारसायकलवर ६ जणांची सशस्त्र टोळी फिरत असल्याची माहिती मिळाली. एपीआय हुड यांनी सोनोरी गावाकडे आपली गाडी वळवली आणि सोनोरी व बपोरीतील गावकर्‍यांना माहिती देऊन त्यांना दरोडेखोरांचा माग काढण्यास सांगितले. गावकर्‍यांनी हातात काठय़ा घेऊन परिसरात धाव घेतली. दोन मोटारसायकलींवर ६ दरोडेखोर दिसताच, गावकरी त्यांच्यामागे धावत सुटले. तोपर्यंत पोलिस ताफा सोनोरी शिवारात पोहोचला. पोलिसांनी दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. पोलिस मागावर असल्याचे पाहून दरोडेखोरांनी दोन्ही मोटारसायकली सोडून दिल्या आणि शेतांमध्ये पळाले. पोलिसांनी पाठलाग करून अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्‍वर तालुक्यातील दहीगाव येथील सुरेश श्यामराव चव्हाण (५0), नरेश सुरेश चव्हाण (३0), संदीप श्रीराम सोळंके (२५) तसेच मधापुरी येथील क्रिष्णा रामराव सोळंके (२0), धनंजय प्रेमराव सोळंके (२0), देवानंद भीमराव सोळंके (२२) या सहा जणांना ताब्यात घेतले. आरोपींवर भादंवि कलम ३९९, ४0२ नुसार गुन्हा दाखल केला. कारवाई मानाचे ठाणेदार सुनील हुड, पीएसआय दिलीप धोटकर, हेकाँ नरेंद्र पद्मने, भगवान मात्रे, सतीश कथे, भालचंद्र पाचाडे, प्रदीप उमक यांनी केली.

** शिकारीच्या नावावर दरोडा

टोळीतील सहा आरोपी हे पारधी समाजातील आहेत. ग्रामीण भागामध्ये रात्री दरोडा घालायचा आणि परिसरात फिरून गावांची, तेथील संपन्न घरांची माहिती घ्यायची. कोणी हटकल्यास त्यांना आपण शिकारी असल्याचे भासवायचे, असा त्यांचा कट होता; परंतु शिकारीच्या नावावर दरोडा घालण्याचे प्रयत्न ग्रामस्थ व पोलिसांच्या समन्वयाने धुळीस मिळाले.

** सोनोरी व बपोरी ग्रामस्थांनी दाखवले धाडस

पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी सोनोरी व बपोरी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष शिंगणे, काळे, बपोरीचे पोलिस पाटील शंकर ढाकरे यांना सतर्क केले. या लोकांनी ग्रामस्थांना ही माहिती दिली. या पदाधिकार्‍यांसह दोन्ही गावातील १५0 ते २00 ग्रामस्थांनी शेतशिवारांमध्ये दरोडेखोरांना घेराव घातला. त्यामुळे दरोडेखोरांनी त्यांच्याजवळील एमएच २७ एसी ७२0, एमएच २७ एडब्लू २६६७ क्रमांकाच्या मोटारसायकली रस्त्यावरच सोडून पळ काढला; परंतु पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने टोळीला अटक केली.

** ग्रामस्थांनी टोळीला चोपले

बाईकर्स गँग दहशतीमुळे आधीच ग्रामीण भागातील लोक त्रस्त झाले आहेत. रात्रभर हातात काठय़ा घेऊन जागरण करीत आहेत. त्यामुळे बाईकर्स गँग हाती सापडल्यानंतर ग्रामस्थांनी टोळीतील सहाही आरोपींना चांगलाच चोप दिला. त्यांच्या मोटारसायकलींचीही तोडफोड केली. परंतु पोलिसांनी कायदा हातात घेऊ नका, आरोपींना आमच्या ताब्यात द्या, असे म्हटल्यावर ग्रामस्थांनी आरोपींना सोडून दिले.

** छर्‍र्याच्या रायफलसह धारदार सुरा जप्त

पोलिसांनी टोळीकडून छर्‍र्याची रायफल, धारदार सुरा, मिरचीची पुड, काळय़ा रंगाची बारूद, ४0 ते ५0 र्छे, लहान दगड आदी साहित्य जप्त केले. यावरून ही टोळी दरोडे घालण्याच्या उद्देशाने बपोरी व सोनोरी गावामध्ये फिरत होती हे पोलिसांच्या लक्षात आले.

** टोळीमध्ये मधापुरीतील युवकांचा समावेश

कुरूमलगत असलेल्या मधापुरी गावामध्ये काही पारधी कुटुंब राहतात. या कुटुंबातील क्रिष्णा सोळंके, धनंजय सोळंके, देवानंद सोळंके या विशीतील तिघा युवकांनी दहीगाव येथील टोळी सोबत घेऊन परिसरातील गावांमध्ये दरोडा घालण्याचा कट रचला होता. या तिघा युवकांना परिसराची इंत्थभूत माहिती आहे.

** अफवेचा फायदा घेण्याचा प्रयत्न

मधापुरी राहणार्‍या क्रिष्णा सोळंके, धनंजय सोळंके, देवानंद सोळंके या युवकांना जिल्हय़ात सर्वत्र बाईकर्स गँग सक्रिय असल्याची कल्पना होती. थोडेफार का होईना, पण शिकलेले असल्याने त्यांना परिस्थितीचीही जाण होती. लोक भयभीत झाले असल्याने, याचाच फायदा उचलण्यासाठी त्यांच्या नात्यामध्ये येणार्‍या सुरेश चव्हाण, नरेश चव्हाण, संदीप सोळंके या तिघांना मधापुरीत बोलाविले आणि सहा जणांनी मिळून रात्री परिसरात फिरून दरोडा घालण्याचा बेत आखला होता.