शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

Ganesh visarjan 2018 : अवघे विघ्ने नेसी विलया...लाडक्या बाप्पाला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 13:05 IST

अकोला: ओसंडून वाहणारा गणेश मंडळांचा उत्साह, ढोलताशे व झांज यांचा गजर, गणपत्ती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या... अशा गणेशभक्तांच्या आर्जवाचा स्वीकार करीत दरवर्षी येणाºया गणरायांनी रविवारी निरोप घेतला.

ठळक मुद्दे मानाच्या बाराभाई गणपतीची विधिवत पूजा करून करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणूकीला सुरूवात झाली.मिरवणुकीमध्ये शहरातील ४५ गणेशोत्सव मंडळ सहभागी झाले होते. गणेश घाट, अनिकट, हरिहरपेठ, हिंगणा रोड, नीमवाडी घाटावर गणेशभक्तांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती.

अकोला: ओसंडून वाहणारा गणेश मंडळांचा उत्साह, ढोलताशे व झांज यांचा गजर, गणपत्ती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या... अशा गणेशभक्तांच्या आर्जवाचा स्वीकार करीत दरवर्षी येणाºया गणरायांनी रविवारी निरोप घेतला. मानाच्या बाराभाई गणपतीची विधिवत पूजा करून करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणूकीला सुरूवात झाली. मिरवणुकीमध्ये शहरातील ४५ गणेशोत्सव मंडळ सहभागी झाले होते. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधिर सावरकर, आमदार गोपीकिसन बाजोरिया,माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, महापौर विजय अग्रवाल, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. मोतीसिंह मोहता, कार्याध्यक्ष संग्राम गावंडे आदींनी बाराभाई गणेशाचे पूजन व महाआरती केल्यानंतर ११.१५ वाजता मिरवणूकीला सुरूवात झाली.महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जनासाठी खोलेश्वर गणेश घाटावर सात कुंड सज्ज ठेवण्यात आले होते. रविवारी सकाळपासूनच गणेशभक्तांनी गणेश घाट, नीमवाडी घाट, अनिकट, हरिहरपेठ, हिंगणा रोडवरील गणेश घाटावर विसर्जनासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली. सायंकाळी तर भाविकांनी अनिकट, नीमवाडी व गणेश घाटावर प्रचंड गर्दी केली होती. ही गर्दी रात्री १२.३0 वाजेपर्यंत अविरत सुरू होती. महापालिकेने याठिकाणी भाविकांच्या स्वागतासाठी स्वतंत्र कक्ष सुरु केला होता. नीमवाडी घाटावर मनपाच्या वतीने मंडप उभारुन भक्तांच्या स्वागताची तयारी केली होती. निर्माल्य टाकण्यासाठी मनपाने कंटेनरची व्यवस्था सुद्धा केली होती. बाप्पाला निरोप देण्यासाठी कुटूंबियासोबत, आई-वडीलांसोबत बच्चे कंपनीने मोठी गर्दी केली होती. चिमुकली मुले गणेश मुर्तीला हातात, डोक्यावर घेऊन विसर्जनासाठी या तिन्ही घाटावर आणत होते. सुरुवातील गणेशावी आरती, विधीवत पुजा करुन गणेशाचे विसर्जन केले जात होते. गणेश घाटावरील गर्दीच्या तुलनेत नीमवाडी घाटावर विसर्जन करणाºया भक्तांची संख्या दुप्पट होती.(प्रतिनिधी)शहरात हर्षोउल्हासात गणेश विसर्जन

लाडक्या गणरायाचे आगमन प्रत्येकाला सुखावणारे असते. घराघरात आनंद आणि प्रसन्नता आणणाऱ्या बाप्पाला निरोप देताना आज प्रत्येक गणेशभक्ताचे मन धीरगंभीर झाले होते. आज आपल्या लाडक्या गणेशाने सर्वांचा निरोप घेतला, तो पुढल्या वर्षी येण्यासाठी...लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी रविवारी शहरातील गणेश घाट, अनिकट, हरिहरपेठ, हिंगणा रोड, नीमवाडी घाटावर गणेशभक्तांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती.

लक्षवेधी, चित्तथरारक...प्रात्यक्षिके

मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या शिवशक्ती प्रतिष्ठान, लोकमान्य आखाडा, हनुमान आखाडा अनिकटच्या कार्यकर्त्यांनी तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी आदी लक्षवेधी, चित्तथराथक प्रात्यक्षिके सादर केली. लेझिम पथकाने भाविकांचे लक्ष वेधून घेतले.सातव चौकात गणेश विसर्जन कुंड

नगरसेविका अ‍ॅड. धनश्री देव, नगरसेवक बबलु जगताप यांच्यातर्फे सातव चौकात गणेश भक्तांसाठी विसर्जन कुंड तयार करण्यात आले होते. तसेच निर्माल्यासाठी मनपाकडून स्वच्छतारथ होता. याठिकाणी शेकडो नागरीकांनी गणेश कुंडामध्ये मुर्तींचे विसर्जन केले.

मिरवणुकीत या मंडळाचा सहभाग

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत बाराभाई गणेश मंडळ, राजराजेश्वर गणेश मंडळ, जागेश्वर गणेश, खोलेश्वर शिवभक्त मंळ, रामभरोसे, गणेशोत्सव मंडळ पोळा चौक, छत्रपती गणेशोत्सव मंडळ देशमुखपेठ, श्री प्रगती गणेशोत्सव मंडळ न्यू आळशी प्लॉट, श्री गणेशोत्सव मंडळ देवरावबाबा चाळ, नवयुवक गणेशोत्सव मंडळ रतनलाल प्लॉट, हनुमान आखाडा खदान, संघर्ष गणेशोत्सव रतनलाल प्लॉट, विप्र युवा वाहिनी भाटे क्लब, श्री माळीपुरा मंडळ, हनुमान आखाडा अनिकट, जुना कापड बाजार गणेशोत्सव, त्रिमुर्ती गणेशोत्सव शास्त्री नगर, तेलीपुरा गणेशोत्सव मंडळ, उमरी रोडचा राजा, छत्रपती गणेशोत्सव शिवाजीनगर, श्रीराम प्रतिष्ठान गणेशोत्सव सुधीर कॉलनी, आदर्श गणेशोत्सव आळशी प्लॉट, अर्जुन समाज गणेशोत्सव मानेक टॉकिज, शिवराज ग्रुप बाळापूर नाका, श्री इच्छेश्वर गणेशोत्सव मंडळ गांधीनगर, श्री समाजसेवा गणेशोत्सव मंडळ डाबकी रोड, डेल्टा टीव्हीएस गणेशोत्सव मंडळ नेहरू पार्क, श्री बालक गणेशोत्सव सिंधी कॅम्प, लोकमान्य आखाडा, सिद्धी विनायक गणेशोत्सव शास्त्री नगर, आरंभ गणेशोत्सव मंडळ तोष्णीवाल लेआऊट, शिवशक्ती प्रतिष्ठान कौलखेड, श्री कल्याण गणेशोत्सव न्यू राधाकिसन प्लॉट, डाबकी रोडवासी गणेश मंडळ, क्रांतीयुवक गणेशोत्सव मंडळ रामदासपेठ, संत गजानन वारकरी मंडळ सावतराम चाळ आदी गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता.

बाजोरिया विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून वाहतूकीचे नियंत्रणगणेशोत्सव मिरवणुकीमध्ये नागरी वाहतूक व सुरक्षेसाठी मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या आरएसपी युनिटने सेवा दिली. आरएसपी युनिटमधील आदित्य लकडे, प्रतिक बानुबाकोडे, अनुज देशमुख, प्रथमेश अवचार, आदित्य मोहोकार, सुजन पांढरकर, संकेत मंजुरकर, सचिन प्रजापत, हर्षल हिरठकर, ओम व्यवहारे, अथर्व वानखडे, शिक्षक गजानन टिपरे आदींनी वाहतूकीचे नियंत्रण करून पोलिसांना सहकार्य केले.सामाजिक संस्थांचा सेवाभावगणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये येणाºया मंडळाचे कार्यकर्ते, भाविकांना जय हिंद चौकात तेलंग परिवाराच्या वतीने महाप्रसाद वितरीत केला. अगरवेसजवळ नगरसेवक अजय रामटेके मित्र मंडळातर्फे खिचडी वाटप, दगडीपुलावर साधुराम तोलाराम जीन नवदुर्गा उत्सव मंडळातर्फे खिचडी, तापडिया कॉम्पलेक्सतर्फे महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.पोलिसांच्या मदतीला वन विभागाचे कर्मचारीपोलीस कर्मचाºयांवरील बंदोबस्ताचा ताण कमी करण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून यंदा प्रथमच अकोट व मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन विभागाचे शेकडो खाकी गणवेशधारी बंदोबस्तात सहभागी झाले होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाGanesh Visarjanगणेश विसर्जनGanpati Festivalगणेशोत्सवMorna Riverमोरणा नदी