शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
3
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
4
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
6
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
7
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
8
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
9
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
10
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
11
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
12
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
13
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
14
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
15
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
16
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
17
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
18
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
19
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
20
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर

 यंदाच्या गणेशोत्सवात शाडू मातीच्या गणेशमूर्तीची क्रेझ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 15:31 IST

शाडूच्या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत असल्याने शाडूच्या मूर्तीकडे भाविक वळत आहे.

- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: निसर्ग आणि गणेशोत्सव हे वेगळेच नाते आहे. ज्या निसर्गातून बाप्पांची मूर्ती घडविण्यासाठी आपण माती घेतो, ती माती निसर्गालाच समर्पित केली पाहिजे. यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे. काळाची ही गरज ओळखून पर्यावरणप्रेमींनी मातीचा गणपतीची स्थापना करण्यासाठी अवघ्या महाराष्ट्रात मोहीम हाती घेतली आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती दिसायला आकर्षक असल्या तरी शाडूच्या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत असल्याने शाडूच्या मूर्तीकडे भाविक वळत आहे. तर काही घरीच मूर्ती बनविण्याच्या तयारीला लागले आहेत; पण शाडू म्हणजे नेमके काय, ती कुठे मिळते, कशी तयार होते, याबाबत अजूनही सामान्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो.शाडूचा शब्दश: अर्थ म्हणजे पांढºया रंगाची चिकण माती. शाडू माती ही गुजरातच्या पोरबंदर येथून देशभरात विक्रीस जाते. या मातीची मागणी जास्त असून, पुरवठा कमी आहे. त्यामुळे मूर्तीचे उत्पादन कमी होत असल्याने त्याच्या किमती प्लास्टरच्या तुलनेत जास्त असतात. समुद्रातील खडकापासून शाडू माती तयार केली जाते. हा दगड गिरणीत दळला जातो. महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात शाडू मातीच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात तयार केल्या जातात. येथील गणपतीच्या मूर्ती जगभरात जातात.अनेकदा बाजारात शाडू मातीच्या नावाने ग्राहकांची फसवणूक होते. शाडूऐवजी फायर क्ले अर्थात वीटभट्ट्यांवर असणाºया मातीचा वापर होतो. कमी किंमत व मुबलक प्रमाणात उपलब्ध होणाºया या फायर क्लेद्वारे मूर्ती बनविताना श्वसनाचे आजार जडतात. शिवाय मूर्तीला तडे जातात. गणपती घरी बनविणाऱ्यांना शाडू बरेचदा उपलब्ध होत नाही. अशा वेळी लाल माती, काळी माती, भस्म्या मुरू म, कंपोस्ट खत एकत्र करू न तयार झालेल्या मातीत बीज टाकून अंकुर गणपती साकारल्या जाऊ शकतो.

अकोल्यात अशी पोहोचते शाडूअकोल्यामध्ये राजस्थान व मध्यप्रदेशातून शाडू माती आणल्या जाते. तेलीपुरा येथे असलेल्या ठोक विक्रेत्यांकडून शहरातील इतर दुकानांमध्ये ही माती पोहोचते. १८ ते २० रुपये किलो दराने ही माती ग्राहकांना उपलब्ध होते. तसेच आॅनलाइन खरेदी करणाºयांसाठी आॅनलाइन शॉपिंग अ‍ॅपवर शाडू क्ले उपलब्ध आहेत.

शाडू मूर्ती कशी ओळखायचीशाडू मूर्ती वजनाला जड असते. आतमधून पोकळ नसते. एका साच्यात तयार झालेली नसते; परंतु मूर्तीचा ढाचा मजबूत असतो. मूर्तीचा रंग चमकदार नसतो. 

शाडू मूर्ती कार्यशाळाघरोघरी पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना व्हावी, यासाठी मागील दोन-चार वर्षांपासून ठिकठिकाणी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. पर्यावरणप्रेमी यामध्ये विद्यार्थी, गृहिणी, हौशी कलावंतांना शाडूपासून मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देतात. आपल्या हाताने आपल्या बाप्पांची मूर्ती बनविल्याबद्दल भाविकांना वेगळाच आनंद होतो.बाजारात मूर्ती उपलब्धशाडूच्या मूर्ती गणेशोत्सवात गणपती विक्रीकरिता भरण्यात येणाऱ्या बाजारात उपलब्ध असतात. पीओपीच्या मूर्तींपेक्षा या मूर्ती महाग असतात. अकोल्यात मागील वर्षी हजारच्या जवळपास शाडूच्या मूर्ती विकल्या गेल्या.शासनाने सहकार्य करावेधर्मशास्त्रानुसार शाडू मातीच्या मूर्ती बनविणे आवश्यक आहे. प्रतिदिन सहस्त्रो टन माती खाणीतून काढली जाते. वर्षातून गणेशोत्सवापूर्वी १० ते १५ टन माती काढली, तर पर्यावरणाची मोठी हानी होत नाही. शासनाने सर्वोतोपरी सहकार्य केल्यास केवळ शाडू मातीच्याच मूर्ती तयार करण्यास मूर्तिकारांना अडचण येणार नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाGanpati Festivalगणेशोत्सव