शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

गांधीजींनी वाडेगावला म्हटले होते...ही तर विदर्भाची बार्डोर्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 14:23 IST

राष्ट्रपीता महात्मा गांधी यांनीचं वाडेगाव ला विदर्भाची बार्डोली असे गौरवाने संबोधिले

-संजय खांडेकर अकोला : तसे पाहिले तर वाडेगाव हे बाळापूर तालुक्यातील लहानसे गाव. मात्र मुगलकाळानंतर बाळापूरला देखिल लहानशा वाडेगावने मागे टाकले. स्वातंत्र्यचळवळीत सर्वांत जास्त लढवय्ये वाडेगाव, पारस दिले. त्यामुळेचं दस्तुरखुद्द राष्ट्रपीता महात्मा गांधी यांनीचं वाडेगाव ला विदर्भाची बार्डोली असे गौरवाने संबोधिले. महात्त्मा गांधीचा १५० वा शताब्दी महोत्सव देशभरात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने वाडेगावच्या गाजलेल्या सभेचा घेतलेला आढावा.मुंबईत झालेल्या भाषणातून महात्मा गांधी यांनी खरा भारत खेड्यात आहे, खेडूत जनतेची सेवा करा असा संदेश दिला. या भाषणाने प्रेरीत होऊन मुंबईतील गुजराती गृहस्थ धनजीभाई ठक्कर भारावले. मुंबईतील शहरी जीवन सोडून अकोला जिल्हा परिसरात देशभक्तीच्या प्रचार-प्रसार कार्यात लागले. त्यांना अकोल्यातील मशरूवाला परिवाराची साथ होतीच. अकोला जिल्ह्यातील खेड्यापाड्यात जाऊन त्यांनी चळवळ उभारली. त्यामुळे हजारो लोक स्वातंत्र्य लढ्यात उडी घेऊ लागले. अकोल्यापेक्षाही मोठा प्रतिसाद बाळापूरच्या वाडेगाव आणि पारस परिसरात मिळत असल्याने धनजीभाई वाडेगाव येथेचं स्थायीक झाले. वाडेगावातूनच मग मोहिम चालवायचे. कै.वीर वामनराव मानकर, कै.अवदूतराव मानकर ,कै.सदाशिव चिंचोळकर, युसूब बेग काझी,कै. महादेव नटकूट, शंकर मानकर यांनी खांद्याला खांदा लावून धनजीभाईंना मोलाची साथ दिली. वाडेगाव येथील मानकर परिवाराचा यामध्ये मोठा पुढाकार होता. जिल्ह्याचे प्रमुख क्रांतीकारक ब्रिजलाल बियाणी सतत वाडेगावला येवून सभा घेत असत.१९२१ च्या असहकार आंदोलनात येथील स्वातंत्र्य सैनिकांचा प्रमुख सहभाग होता. १९२७ मध्ये अकोला येथील रामगोपाल अग्रवाल यांच्या वाडेगाव येथील जागेत धनजीभाईंनी कार्यालय उघडले. १९३२ च्या मिठाच्या सत्याग्रहात वाडेगाव, पारस, आलेगाव येथील लढवय्ये सहभागी झाले. वाडेगावची कीर्ती अकोल्या जिल्ह्यातच नव्हे तर देशात गाजू लागली. महात्त्मा गांधीपर्यंत ही बातमी पोहोचली. वाडेगावची दखल घेत महात्त्मा गांधी १८ नोव्हेंबर १९३३ त्यांनी येथे सभा घेण्याचा निर्णय घेतला.हरीजन सेवक संघाच्या कार्याकरीता महात्मा गांधी १७ नोव्हेंबर रोजी अकोला परिसरात दौऱ्यावर आले.अमरावतीहून कारंजा मार्गे मूर्तिजापूर , येथून रेल्वेमार्गे शेगाव, तेथून खामगाव येथे गेले. येथे मुक्काम करून १८ नोव्हेंबर रोजी अकोला जिल्हा दौरा सुरू झाला. सकाळी आठ वाजता ते वाडेगाव येथे पोहोचले. गांधीजींचे भव्य स्वागत येथे झाले.बैलगाड्या भरभरून त्यांच्या सभेला माणसांची गर्दी झाली. त्याकाळी एक लाख लोकांनी सभेला गर्दी केली होती. वाडेगावच्या निगुर्णा नदीच्या पात्रात ही भव्य जाहीर सभा झाली. त्याच वेळी त्यांनी वाडेगावला बार्डोली आॅफ बेरार असे संबोधून वाडेगाववासियांचा सन्मान केला. स्वातंत्र्याची ज्योत पेटविणारे भाषण महात्मा  गांधींचे येथे झाले होते. याच दरम्यान राष्ट्रपती महात्मा गांधी यांनी अकोल्यातील राष्ट्रीय शाळेला भेट दिली. राष्ट्रीय शाळेत दोनदा महात्मा गांधीनी भेट दिल्याच्या नोंदी आहेत. पहिल्यांदा जेव्हा गांधीची येथे आले होते. तेंव्हा त्यांनी साबरमतीच्या आश्रमातून प्रशिक्षण घेऊन आलेल्या गणपत बोराळे या शिक्षकाची आत्मीयतेने चौकशी केली होती. महात्मा गांधीच्या सुष्ना निर्मला रामदास गांधी (अहमदनगर) आणि सुशीला गांधी (कन्नूभाईं मश्रुवाला यांच्या बहीण) यांनी केल्याच्या नोंदी आजही राष्ट्रीय शाळेत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाMahatma Gandhiमहात्मा गांधी