शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

मनपा विरोधी पक्षनेत्यांची गांधीगिरी; लघू व्यावसायिकांवरील कारवाईचा केला निषेध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 12:14 IST

मनपातील विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी सोमवारी गांधी रोडवर कपड्यांची विक्री करीत मनपा प्रशासनाच्या कारवाईचा गांधीगिरीच्या मार्गाने निषेध व्यक्त केला.

अकोला: गांधी रोडवरील लघू व्यावसायिक व फेरीवाल्यांना अट्टहासापोटी गणेश घाटावर हुसकाविण्याचे प्रयत्न मनपाकडून होत असल्याने ऐन रमजानसारख्या सणासुदीच्या दिवसांत त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. मनपाने तयार केलेली नियमावली सर्वांना लागू करा, केवळ गांधी रोडवरील लघू व्यावसायिकांवर जबरदस्ती करू नका, असे सांगत मनपातील विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी सोमवारी गांधी रोडवर कपड्यांची विक्री करीत मनपा प्रशासनाच्या कारवाईचा गांधीगिरीच्या मार्गाने निषेध व्यक्त केला.शहरातील गांधी रोड, टिळक रोड, जुना भाजी बाजार, मोहम्मद अली रोड, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉज आदी अत्यंत गजबजलेल्या मुख्य मार्गांवर लघू व्यावसायिक व फेरीवाले व्यवसाय करतात. रस्त्याच्या दोन्ही बाजंूनी लघू व्यावसायिक दुकाने उभारत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून राज्य शासनाने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचे महापालिकेला निर्देश दिले आहेत. फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी शासन स्तरावर मोबाइल अ‍ॅप विकसित करण्यात आले असून, त्याचा वापर महापालिकेने केल्यानंतर शहरातील मुख्य मार्गांवर सुमारे १८०० पेक्षा जास्त लघू व्यावसायिक-फेरीवाले व्यवसाय करीत असल्याचे चित्र समोर आले. महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी पुढाकार घेत संबंधित लघू व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत अनेकदा बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. गांधी रोड, काश्मीर लॉज, टिळक रोड, जनता भाजी बाजार आदी भागातील व्यावसायिकांना मुख्य गणेश घाटावर पर्यायी जागा देण्यासाठी नियोजन करण्यात आले. मागील काही दिवसांपासून केवळ गांधी रोडवरील लघू व्यावसायिकांना गणेश घाटावर हलविण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. मनपाने इतर ठिकाणच्या लघू व्यावसायिकांना अभय दिले असून, गांधी रोडवरील व्यावसायिकांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप करीत मनपातील विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी प्रशासनाच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकविल्याचे दिसत आहे.

आधी वरली अड्डे बंद करा त्यानंतर...सोमवारी सकाळी विरोधी पक्षनेता साजीद खान यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गांधी रोड परिसरात लघू व्यावसायिकांनी दुकाने थाटली. यावेळी अतिक्रमण विभाग व सिटी कोतवाली पोलिसांनी लघू व्यावसायिकांना हुसकाविण्याचा प्रयत्न केला असता, आधी शहरातील वरली, मटका, जुगार आदी अवैध धंदे बंद करा, त्यानंतर इमानदारीने पोट भरणाऱ्या व्यावसायिकांना हटवा, असे सांगत साजीद खान यांनी सिटी कोतवाली पोलिसांना त्यांच्या कर्तव्याप्रती आरसा दाखविला.

मनपाने संपूर्ण शहरातील लघू व्यावसायिकांची माहिती गोळा केली असून, त्यांना पर्यायी जागा देण्याचे नियोजन केले आहे. ऐन रमजानसारख्या सणासुदीच्या दिवसांत फक्त गांधी रोडवरील व्यावसायिकांना हटविण्याचा अट्टहास कशासाठी, असा सवाल उपस्थित होतो. मनपाने सर्वांना समान न्याय द्यावा, एवढीच अपेक्षा आहे. सणासुदीच्या दिवसांत शहरातील कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही, यावर मनपाने विचार करावा.- साजीद खान पठाण, विरोधी पक्षनेता मनपा. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका