शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात गणरायाची जल्लोषात मिरवणूक, ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप

By नितिन गव्हाळे | Updated: September 28, 2023 17:18 IST

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने गणपती बाप्पाची थाटात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शहरातील १४६ गणेशोत्सव मंडळे वाजतगाजत सहभागी झाले होते.

अकोला : गणपतीबाप्पा चालले गावाला...चैन पडेना आम्हाला...अशा लाडक्या गणरायाचे १० दिवस आदरातिथ्य करून २८ सप्टेंबरला लाडक्या बाप्पाला अकोलेकर भाविकांनी...गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...अशी विनवणी करीत, जड अंत:करणाने निरोप दिला. सकाळी ११ वाजताच्या सुमारास जुने शहरातील जय हिंद चौकातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. काही गणपती मिरवणुकीतून गांधीग्राम येथील पूर्णा नदीवर रवाना झाले. 

शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने गणपती बाप्पाची थाटात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शहरातील १४६ गणेशोत्सव मंडळे वाजतगाजत सहभागी झाले होते. यंदा साऊंड सिस्टीमऐवजी ढोल-ताशांसह दिंडी पथकावर गणेश मंडळांनी भर दिला. मिरवणुकीला सकाळी ११ वाजता प्रारंभ करण्यात आला तरी दुपारी २ वाजेपर्यंत केवळ ४४ गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली होती. विसर्जन मार्गावर दुपारी ५ वाजेपर्यंत गर्दीही कमी होती. सायंकाळी सहानंतर मिरवणुकीमध्ये इतर गणेश मंडळांच्या वाहनांनी प्रवेश केला. ढोल-ताशांचा गजर....दिंडी पथकाचे ढोल व बासरीचा निनाद...फटाक्यांची आतषबाजी, गुलाल, फुलांची उधळण....बाप्पा मोरयाच्या गजराने शहरातील वातावरण नादमय झाले होते.

जय हिंद चौकात मानाच्या बाराभाई गणेशासह राजराजेश्वर मंडळ, जागेश्वर गणेश मंडळ, खोलेश्वर गणेश मंडळाच्या गणरायांचे स्वागत आणि पूजन करून महाआरती करण्यात आली. त्यानंतर मिरवणूक श्रीवास्तव चौक, अगरवेस मार्गे दगडीपूल, रायली जिनमार्गे टिळक रोडवर पोहोचली. ठिकठिकाणी भाविकांनी मिरवणुकीचे स्वागत केले. माळीपुरा चौकातून मिरवणूक रेडक्रॉस सोसायटीच्यासमोर पोहोचली. याठिकाणी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी बाराभाई गणेशाचे पूजन केले. यावेळी रेडक्रॉस सोसायटीचे मानद् सचिव प्रभजितसिंह बछेर उपस्थित होते. त्यानंतर मिरवणूक सुभाष चौक, तेलीपुरामार्गे ताजनापेठ, मोठ्या मशिदीसमोरून मार्गक्रमण करीत, जैन मंदिराजवळ पोहोचली. गांधी चौकात मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.जिल्हाधिकारी, एसपींकडून महाआरती

जय हिंद चौकात मानाच्या बाराभाई गणपतीच्या पालखीचे जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी पूजन करून महाआरती केली.गणेशोत्सव मिरवणुकीत सर्वपक्षीय नेत्यांची मांदियाळी

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत गुरूवार २८ सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय नेत्यांची मांदियाळी पाहावयास मिळाली. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवAkolaअकोला