शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामावर चालला गजराज!

By admin | Updated: November 21, 2015 01:52 IST

अकोला मनपाची आजवरची सर्वात मोठी कारवाई: मंजुरीपेक्षा होते तीनपट अधिक बांधकाम.

अकोला: महानगर पालिकेने मंजूर केलेल्या क्षेत्रफळापेक्षा इमारतीचे तब्बल तीनपट अनधिकृत बांधकाम उभारणार्‍या वाडेगावचे माजी सरपंच आसीफ खान मुस्तफा खान व शहरातील प्रख्यात अस्थीरोग तज्ज्ञ डॉ.रहेमान खान यांच्या इमारतीचा अनधिकृत भाग महापालिका प्रशासनाने शुक्रवारी जमीनदोस्त केला. वाशिम बायपास चौकात मनपाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई मानल्या जात आहे. मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी निर्माणाधिन १८६ इमारतीच्या मालमत्ताधारकांना नोटिस बजावून अनधिकृत बांधकाम बंद करण्याचे सुचित केले होते. कल्याणकर यांची बदली होताच व्यावसायिकांनी इमारतींचे बांधकाम सुरू केले. मनपा आयुक्त अजय लहाने यांनी अशा निर्माणाधिन बांधकामांवर कारवाईचे हत्यार उपसल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली. ही बाब ध्यानात घेता आयुक्त लहाने यांनी १८ नोव्हेंबर रोजी संबंधित मालमत्ताधारकांची मनपात बैठक घेऊ न सूचना केल्या होत्या. यादरम्यान, वाडेगावचे माजी सरपंच आसीफ खान व शहरातील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.रहेमान खान यांनी वाशिम बायपास चौकात अनधिकृत बांधकाम करून पाच मजली इमारत उभारल्याची तक्रार डॉ.कनीज आयेशा अरब यांनी मनपासह विभागीय आयुक्तांकडे केली होती. मनपाने तक्रारीची शहानिशा केली असता आसीफ खान यांनी मंजूर क्षेत्रफळ ६0३ चौरस मीटरपेक्षा तब्बल तीन पट अधिक २ हजार ४00 चौरस मीटर बांधकाम केल्याचे समोर आले. यामध्ये चारही बाजूने एकूण १५ फूट अधिक अतिरिक्त बांधकाम करण्यात आले. तर पाचवा मजला संपूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे आढळून आले. इमारतीचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्याचे आयुक्त अजय लहाने यांनी आदेश दिले. त्यानुसार नगर रचना विभाग व अतिक्रमण विभागाच्या पथकाने दुपारी १ वाजता कारवाईला सुरुवात केली. सायंकाळपर्यंंत ही कारवाई करण्यात आली.