शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

‘ई-वे-बिलिंग’मुळे जीएसटी चोरी थांबणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:26 IST

जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी तर झाली; मात्र अपेक्षित असलेला महसूल अजूनही तिजोरीत येत नसल्याने आता जीएसटी परिषदेने संशोधनात्मक अभ्यास सुरू केला. चर्चा आणि अभ्यासाअंती १६ डिसेंबर रोजी जीएसटी परिषदेने याबाबत घोषणा केली. आंतरराज्यीय ई-वे-बिलिंग १ फेब्रुवारीपासून अनिवार्य झाल्यास यापुढे जीएसटीच्या अनेक चोर्‍यांवर अंकुश लागण्याचे संकेत आहेत.

ठळक मुद्दे१ फेब्रुवारीपासून अंमलबजावणीची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी तर झाली; मात्र अपेक्षित असलेला महसूल अजूनही तिजोरीत येत नसल्याने आता जीएसटी परिषदेने संशोधनात्मक अभ्यास सुरू केला. चर्चा आणि अभ्यासाअंती १६ डिसेंबर रोजी जीएसटी परिषदेने याबाबत घोषणा केली. आंतरराज्यीय ई-वे-बिलिंग १ फेब्रुवारीपासून अनिवार्य झाल्यास यापुढे जीएसटीच्या अनेक चोर्‍यांवर अंकुश लागण्याचे संकेत आहेत.      वस्तूंच्या मागणी आणि पुरवठय़ावर लक्ष केंद्रित करून काही व्यापार्‍यांनी शक्कल लढवून जीएसटीची चोरी सुरू केली होती. जुलैपासून लागू झालेल्या जीएसटी अंमलबजावणीपासून अनेकांचा गोरखधंदा सुरू आहे. गुजरातमधून साहित्य घेऊन निघणारा व्यक्ती पूर्वी तेथील बिल घेऊन महाराष्ट्रात यायचा. माल उतरविला गेला की त्यांची नगद रक्कम घेऊन पूर्वीचे बिल फाडून दिले जायचे. केवळ दाखविण्यासाठी जीएसटी बिल नाममात्र होते. उत्पादन शुल्क, जकात, बंद झालेल्या सेल्स टॅक्स विभागाचा वचक नसल्याने हे प्रकार वाढले होते. याबाबत ‘लोकमत’ने अनेक बातम्याही प्रकाशझोतात आणल्यात. दरम्यान, १६ डिसेंबर या जीएसटी परिषदेच्या २४ व्या बैठकीत ई-वे-बिलिंग अनिवार्य करण्यात आले. ई-वे-बिलिंगमुळे चोरीचे प्रकार करणे जवळ जवळ अशक्य होणार आहे. १६ जानेवारीपासून देशभरातील यंत्रणा यासाठी सज्ज राहणार असून, त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात झालेली आहे. जीएसटी अंमलबजावणीवर चर्चेनंतर देशभरात ई-वे-बिलिंग सुरू करण्याचे ठरले आहे. आंतरराज्यीय ई-वे-बिलिंगमधून आता काय नवीन चोरीची युक्ती काढली जाते, याकडे जीएसटी अधिकार्‍यांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्राबाहेर काही ठिकाणी जीएसटी चोरीसंदर्भात कारवाया झाल्या आहेत. भविष्यात अशा कारवायादेखील राज्यात होणार असल्याचे संकेत आहेत. यासाठीच ई-वे-बिलिंग १ फेब्रुवारीपासून अनिवार्य केले जात आहे. 

टॅग्स :GSTजीएसटीAkola cityअकोला शहर